amarawati
amarawati 
विदर्भ

भारतीय तिरंदाजीच्या इतिहासातला पहिला प्रयोग, होणार ऑनलाइन प्रशिक्षण

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : भविष्यातील ऑलिम्पिकपटू घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र तिरंदाज संघटनेने ऑनलाइन प्रशिक्षणाचा नवा फंडा हाती घेतला आहे. त्यातूनच गावखेड्याच्या धु-यावरच्या आर्चरीची पायाभरणी केली जात आहे. संपूर्ण राज्यात १० ते १६ मेदरम्यान हे ऑनलाइन प्रशिक्षण होणार असून राज्यातील ५०० च्या वर ग्रामीण भागातील नवे धनुर्धर त्यात सहभागी होत आहेत. भारतीय तिरंदाजीच्या इतिहासातील हा अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग आहे.
ऑल इंडिया आर्चरी असोसिएशन व स्पोर्ट ऑथॅरिटी आँफ इंडियाच्या वतीने भारतातील सर्व धनुर्विद्येच्या खेळाडू, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, फिजिओथेरपिस्ट तसेच अन्य तज्ज्ञांचा गेल्या १५ दिवसांपासून संवाद सुरू होता. लॉकडाउनच्या काळात सर्व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा फिजिकल व मेंटल फिटनेस कायम राहावा, यादृष्टीने सविस्तर चर्चा झाली. त्यातूनच नवनव्या संकल्पना पुढे आल्या. त्यावर आता अंमलबजावणी करण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनने राज्याच्या ग्रामीण भागातील धनुर्धरांच्या प्रतिभेचा विचार करून धु-यावरील आर्चरी ही संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगले मैदान, अकादमी, प्रशिक्षण मिळत नसल्याने त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. येत्या १० ते १६ मे या कालावधीत हे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल. आपण ज्या ठिकाणी राहता त्याच ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनांमध्येच खेळा व आपल्या प्रतिभेला वाव द्या, असा संदेश या माध्यमातून दिल्या जाणार आहे. अर्थात लॉकडाउन असल्याने आपल्या घराच्या अंगणात सामाजिक अंतर राखून तसेच शासनाने जे नियम सांगितले आहे त्याचे पालन करूनच सराव करून आपला फिटनेस कायम ठेवायचा आहे. मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमाने या ऑनलाइन प्रशिक्षणात राज्यातील सुमारे ५०० धनुर्धर सहभागी होणार आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला असल्याने सर्वजण घरीच आहेत. अशा स्थितीत आपला फिजिकल तसेच मेंटल फिटनेस कायम राहावा, यासाठी खेळाडूंना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
भविष्यातील ऑलिम्पिकचे खेळाडूसुद्धा या माध्यमातून घडण्यास मदत होणार आहे. सध्याच्या स्थितीत आपले तीन युवक व एक युवती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. पॅराऑलिम्पिकच्या संघात पुरुष व महिला, असे दोन्ही संघ सज्ज आहेत.
सविस्तर वाचा - बियाणे खरेदी करताय सावधान
खेळाडू अ‍ॅक्टिव्ह राहावा, यासाठी  प्रयत्न
धनुर्विद्येच्या खेळाडूंना अशा पद्धतीने प्रशिक्षण महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. हे देशासाठी रोलमॉडेल ठरेल, त्यातूनच उत्तम खेळाडूसुद्धा घडतील, असा विश्वास आम्हाला आहे.
 प्रमोद चांदूरकर, सचिव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT