तिरोडा : गाईच्या गर्भात विर्यकांड्या सोडताना पशुधन कर्मचारी. 
विदर्भ

तिरोड्यात आता गाई-म्हशीच जन्माला येणार...काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

चित्रा कापसे

तिरोडा (जि. गोंदिया) : पशुधन पालकांची टक्केवारी वाढावी, त्यांच्यात आर्थिक भरभराट व्हावी, यासाठी अदानी फाउंडेशनने फक्त मादीच होण्याचे गुणसूत्र विर्यकांड्या वापरून (सॉर्टेड सेक्‍स सिमन) कृत्रिम रेतन हे तंत्र पशुपालकांसाठी सुरू केले आहे. या तंत्राअंतर्गत गाईंमध्ये कालवड, म्हशींमध्ये वगार मादीच जन्म देण्याची हमी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते. दुग्धव्यवसायासाठी जिल्ह्याचे भौगोलिकदृष्ट्या वातावरण अतिशय पोषक आहे. त्यामुळे पशुधन पालकांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे.

दूध उत्पादन क्षमता वाढणार

जिल्ह्यात दोन पशुधन विकास केंद्राची (एलडीसी) पशुधन सेवा ही 26 गावांमध्ये कार्यरत आहे. त्याअंतर्गत 7 हजार 60 दुभत्या जनावरांपासून दिवसाकाठी 10762.5 लिटर दूध उत्पादन होते. यामुळे तालुक्‍यातील दूध उत्पादन क्षमता वाढत आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत दूध उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी गाई, म्हशींनी जन्माला घातलेले कालवडाचे प्रमाण अधिक असणे आवश्‍यक आहे.

सॉर्टेड सेक्‍स सिमन कृत्रिम रेतन

सध्या फिमेल-मेल प्रजननाचे प्रमाण फिफ्टी-फिफ्टी आहे. ते फिमेल प्रजनन 90 टक्‍के करण्यासाठी अदानी फाउंडेशनने पशुसंवर्धन व संबंधित उपक्रम (कामधेनू) पशुधन विकास केंद्राची स्थापना करून नवीन तंत्रज्ञानाचे सॉर्टेड सेक्‍स सिमन कृत्रिम रेतन सुरू केले आहे. सॉर्टेड सिमेन हे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने प्रक्रिया केलेले गुणसूत्र विर्यकांड्या आहेत. याचा वापर गाई, म्हशींमध्ये केल्यास व गर्भधारणा राहिल्यास मादी जन्माला येण्याचे प्रमाण 90 टक्‍के किंवा त्याहून जास्त असते, असा दावा फाउंडेशनने केला आहे.

256 गावांत हे कृत्रिम रेतन केंद्र

अदानी फाउंडेशनचे नितीन शिराडकर यांनी सांगितले की, 2020-21 या वर्षांत एक हजार सॉर्टेड सिमेन कृत्रिम रेतन पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तिरोडा तालुक्‍यातील आतापर्यंत 256 गावांत हे कृत्रिम रेतन केंद्र पूर्ण झाले आहे.


संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवावा
हा उपक्रम फारच उत्कृष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन वाढेल. त्यामुळे पशुपालकांना आपोआपच आर्थिकदृष्ट्या बळकटी येईल. शासनस्तरावर संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविण्यात यावा.
- डॉ. प्रकाश गंगापारी, पशुधन विकास अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT