छायाचित्र 
विदर्भ

माकडउड्या मारणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवावा ः राजेंद्र मुळक

सकाळ वृत्तसेवा

टेकाडी : भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना "कॉंग्रेस मुक्त'चे स्वप्न दाखवले. आता कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्यांना डोक्‍यावर बसवले जात आहे. त्यामुळे भाजपमध्येच सर्वाधिक अस्वस्थता असून स्वतःच्या स्वार्थासाठी माकडउड्या मारणाऱ्या पुढाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवावा, असे आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सोमवारी कन्हान येथील युवक कॉंग्रेसच्या मेळाव्यात केले.
मुळक म्हणाले, ज्या नेत्याचा स्वतःवर विश्वास नाही तोच पक्ष सोडून जात आहे. त्याला जनतेसोबत कुठलेही घेणे देणे नसून स्वतःच्या हिताचाच विचार करतो. अशा पुढाऱ्यांना जनतेने धडा शिकवायला हवा. विदर्भातील कॉंग्रेसचे नेते मात्र अजूनही पक्षाशी निष्ठा ठेवून असून ते समस्या सोडविण्यासाठी तयार आहेत. जिल्ह्यात कॉंग्रेसचा झेंडा सर करण्याची ताकद ठेवत असल्याचेही मुळक म्हणाले.
तारसा रोड येथील कॉंग्रेस पक्ष कार्यालयानजीकच्या हार्दिक मंगल कार्यालयातील या मेळाव्यात सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी, भाजपच्या चुकीच्या धोरणाला धारेवर धरले. ते म्हणाले, लोकशाहीत सत्ता पक्षाला प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे, परंतु येथे विरोधकांनाच प्रश्न विचारला जातो की, 70 वर्षांत काय केलं? पण पाच वर्षांत भाजपने देशाचे, राज्याचे जे वाटोळे केलेय हे कुणीच विचारत नाही हे दुर्दैवी असल्याचे खडेबोल त्यांनी सुनावले.
मेळाव्यात अनेक तरुणांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाला नरेश बर्वे, चंद्रपाल चौकसे, सचिन किरपान, दयाराम भोयर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT