गोधनी ः होले ले-आउटमधील कच्चा रस्ता.  
विदर्भ

रस्ता बांधला तरच मतदान करू!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना गोधनी रेल्वे परिसरातील होले ले-आउटमधील नागरिकांनी वस्तीतील रस्ता बांधला, तरच मतदान करू, असा पवित्रा घेतला आहे. गोधनी रेल्वे परिसरातील होले ले-आउटमधील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देत शुक्रवारी रात्री आंदोलन केले. वेळेवर घरटॅक्‍स, पाणीटॅक्‍स भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही. मतदान करूनही ग्रामस्थांना अच्छे दिन न आल्याने आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
गोधनी रेल्वे भागात 15 वर्षांपूर्वी होले ले-आउट वस्ती वसली. वस्तीतील रहिवाशांची संख्या दिवसागणिक वाढत असून, परिसरात नवीन संकुलाची निर्मिती झाली आहे. परिसरात 35 ते 40 कुटुंबे राहत असून, सुमारे 300 मतदार आहेत. ग्रामस्थांच्या पुढाकाराने कच्चा रस्ता बनविला होता. परंतु, जोरदार पावसामुळे तो वाहून गेला. आता परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी चिखल तुडवत जावे लागते. घरासमोर चिखल झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. राजेश डोंगरे, राजेश खरडाते, अजय पवार, रमेश चौधरी, राजेश बुवाडे, भरत पाटणकर, प्रवीण राऊत, लह्या बुवाडे, अनिरुद्ध वडस्कर, रवींद्र मगारडे, हरिराम डोंगरे आदींनी रस्त्यासाठी आंदोलन केले. दिवसेंदिवस या भागात नवनवीन गृहसंकुले उभी राहत असल्याने वर्दळ वाढत आहे. त्या तुलनेत विकासाची गती संथ असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
गटारलाइन, कचऱ्याची विल्हेवाट नाही
वस्तीतील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. परिसरातील गटारलाइनही खुल्या आहेत. कचऱ्याची उचल करण्यासाठी नियमित गाडी येत नसल्याने परिसरात कचऱ्याचे साम्राज्य असते. अशा एक ना अनेक समस्यांचा सामना होले ले-आउटमधील नागरिक दररोज करतात. समस्यांनी त्रस्त नागरिकांनी सुविधा मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार कायम ठेवणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले! भारतात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा ताजे रेट

SCROLL FOR NEXT