File photo 
विदर्भ

अंशकालीन शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन शिक्षकांची समुपदेशनाची प्रक्रिया बुधवारी (ता.18) जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी जलज़ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. त्यामुळे या शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागामार्फत लवकरच नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे या शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षकांच्या रिक्तपदांचा प्रश्‍नसुद्धा आता बऱ्यापैकी सुटणार आहे.

शासनाने बुधवारी (ता.4) जारी केलेल्या "जीआर'नुसार प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शिक्षकांची समुपदेशनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबरोबरच पदवीधर अंशकालीन शिक्षकांचेसुद्धा समुपदेशनाची प्रक्रिया राबविण्यात आली. यादरम्यान जिल्ह्यातील 139 पदवीधर अंशकालीन शिक्षकांचे समुपदेशनाची प्रक्रिया बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आले. जिल्ह्यातील महागाव, उमरखेड व पुसद या तीन तालुक्‍यांत शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदेरिक्त आहेत. त्या रिक्त पदांवर पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. काही प्रमाणात रिक्त पदांचा प्रश्‍नदेखील यामुळे सुटणार आहे. त्याबरोबरच प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त आदेशानुसार त्यांनी शिक्षकांची वर्गवारी करून मंगळवारी प्राथमिक शिक्षकांचीदेखील समुपदेशनाची प्रक्रिया राबविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रशासनाचा मोठा निर्णय! रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पण कोणत्या मार्गावर?

Koyna Dam Water Release Update : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा! कोयनेचा विसर्ग वाढला; पहा किती क्युसेक वेगाने येतंय पाणी?

"माझ्या घरी दोन चिक्स.."! अरे ए माईक सुरूय... ड्वेन ब्राव्होला KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेने थांबवले... वादग्रस्त Video Viral

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

SCROLL FOR NEXT