file photo
file photo 
विदर्भ

बाहेरच्या प्रचारकांना जिल्ह्यात मनाई 

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत मतदान होणार आहे. आज, शनिवारी अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभेतील प्रचारतोफा दुपारी 3 वाजता, तर गोंदिया आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघातील प्रचारतोफा सायंकाळी 6 वाजता थंडावल्या. दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मतदान केंद्र परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. बाहेरच्या प्रचारकांनाही जिल्ह्यात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. 
निवडणूक चिन्ह वाटपानंतर म्हणजेच 8 ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडाला. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीदेखील धडाक्‍यात प्रचार केला. ऑटोरिक्षा, सायकलरिक्षा, चारचाकी वाहनांतून भोंगा आणि वाद्यांच्या आवाजात प्रचार करण्यात आला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीदेखील या कालावधीत झाडण्यात आल्या. पदयात्रा आणि भेटीगाठी घेऊन उमेदवार मतदारांची मने जिंकताना आढळून आले. दरम्यान, गेले 12 ते 13 दिवस धडाक्‍यात प्रचार सुरू असताना, या प्रचारतोफा शनिवारी थंडावल्या. उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आता "डोअर टू डोअर' भेटीवर जोर असेल. 
तथापि, निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे, निवडणूक खर्चविषयक बाबी तसेच रोख रक्कम, दारू किंवा लाचेची कोणतीही वस्तू देणे व त्यावर आळा घालण्यासाठी निवडणूक विभागाची भरारी पथके, स्थिर संनियंत्रण पथके यांना सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. बलकवडे यांनी दिले आहेत. प्रचार बंद असलेल्या कालावधीत ही पथके 24 तास कार्यरत राहणार आहेत. 
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 द्वारे मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मतदान केंद्राच्या 200 मीटर व 100 मीटर परिसरामध्ये कुठलीही प्रतिबंधित कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील कलम 126 अंतर्गत मतदान संपण्यापूर्वी 48 तासांमध्ये प्रचारबंदी असल्यामुळे मतदारसंघातील मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सर्व व्यक्ती तसेच स्टार प्रचारक यांना जिल्ह्याच्या सीमेत राहण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी अथवा विदेशी मद्यविक्री करणारे परवानाधारक दुकाने मतदान संपण्याच्या 48 तासांपूर्वी या कालावधीत तसेच मतमोजणीच्या दिवशी 24 ऑक्‍टोबरला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री केल्याचे आढळून आल्यास परवाने रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम नेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला रक्कम सोबत नेत असल्याचा आधार देणारा पुरावा म्हणून कागदपत्रे सोबत बाळगावी लागणार आहेत. तसेच मतदारांना लाच देणे किंवा धमकी देणे हा केवळ निवडणूक अपराध नसून, भारतीय दंड संहिताअन्वयेसुद्धा दंडनीय आहे. म्हणून प्रत्येकाने अशा कृतींपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वयंसहायता समूह किंवा अशा संस्थांना सार्वजनिक राज्य कोषातून रोख किंवा धनादेशाद्वारे कोणतेही प्रदान वितरित न करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT