Painful journey of pregnant Women Nanda in Chandrapur district 
विदर्भ

गर्भवतीचा वेदनादायी प्रवास : २ तासांच्या प्रवासाला लागले ७ तास

रेल्वेतून प्रवास करून जुळ्या बाळांना दिला जन्म

दीपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर) - प्रस्तुती म्हटलं की स्त्रीचा पुनर्जन्मच आणि या परिस्थितीत आरोग्य सेवा वेळेवर मिळाल्या नाही तर जीवासी मुकावे लागते. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा येथील रंजनी सुरेश तलांडे  या गर्भवती मातेच्या धाडसी वेदनादायी प्रवास थक्क करणारा आहे सपुर्ण चंद्रपूर जिल्हात काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत होता.

रंजनी सुरेश तलांडे चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा येथील आहे. दि. १४ जुलै ला धो - धो पाऊस चालू असतानाच सायंकाळ ७ च्या सुमारास वेदना सुरू झाल्या. येथील अशा सेविका लता गेडाम यांना मदतीला घेऊन त्या ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे पोहोचल्या. परंतु येथील डॉक्टरांनी रेफर टू राजुरा आणि राजुरा वरून रेफर टू जिल्हा रुग्णालय चंद्रपूर अशी चिट्टी हातात मिळाली आणि परिवाराला धक्काच बसला. पूर परिस्थितीने जिल्ह्यातील सर्व मार्ग बंद होते.

जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे सर्व परिवाराच्या चिंता वाढल्या असतांना एक मार्ग निघाला चुनाला येथील माणिकड रेल्वे स्टेशन ने बल्लापुर जायचं आणि तिथून चंद्रपूर भर पावसात कुटुंबानी रेल्वे स्टेशन गाठले. वेदनादायी गर्भवती रंजनी तलांडे यांनी धीर न सोडता प्रवास सुरु झाला. माणिकगड स्टेशन गाठले परंतु तिथे थांबा असणारी एकही गाडी उपलब्ध नव्हती शेवट स्टेशन मास्तर यांना विनंती करून सिकंदराबाद दानापूर गाडीतून बल्लारपूर स्टेशन पर्यंत अश्या परिस्थिती असतांना सुद्धा डब्यात शौचालय च्या बाजुला खाली बसुन तिला बल्लारशहा स्टेशन पर्यंत प्रवास करावा लागला.

बल्लारपूर स्टेशन वरून शासकीय रुग्णालया चंद्रपूर गाठायला तब्बल रात्री १.३० वाजले ७ तास प्रवास करून १५ तारखेला सकाळी तिने जुळ्या गोंडस बाळास जन्म दिला. या सर्व प्रसंगात आशा सेविका लता गेडाम यांचा मोलाचा वाटा होता.

१४ वर्षांच्या काळात माझी ही पाहिली वेळ आहे. पूर परिस्थितीमुळे इतक्या संकटाचा सामना करावा लागला

- लता गेडाम, आशा सेविका, नांदा.

ग्रामीण रुग्णालय गडचांदूर हे फक्त रेफर टू चंद्रपूर याच कामासाठी आहे.कुठल्याही नॉर्मल केसेस ला रेफर केले जाते.

- प्रणित अहिरकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT