विदर्भ

पलकचा अमरावतीच्या कॅन्सरग्रस्तांना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : बालपण म्हणजे खेळण्या बागडण्याचे दिवस. सुखाच्या पलीकडे दुसरे काहीच ठाऊक नसलेली अवस्था. आजच्या काळात तर चिमुकल्यांचे विश्‍वच मोबाईल, व्हिडीओ गेम्सने व्यापले आहे. मात्र या पलीकडेही जाऊन समाजाप्रती आपले काही कर्तव्य आहे, ही भावना बालवयात येते ही बाबच दुर्मिळ म्हणावी लागेल. अशीच सामाजिक भावना जपत अमरावतीची कन्या मात्र सध्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या पलक विकास माहेश्‍वरी हिने गेम्स, खाऊसाठी मिळालेले पैसे साठवत अमरावतीच्या कॅन्सर रुग्णांना एक लाख रुपयांची मदत करून समाजाला आरसा दाखविला आहे. स्थानिक शारदानगर येथे आजोबांकडे आलेल्या पलक, तिचे वडील विकास माहेश्‍वरी व आई शीतल माहेश्‍वरी यांनी श्रीकृष्ण भक्तीसेवा संस्थानच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी एक लाखाचा निधी देत खारीचा वाटा उचलला आहे. पलक सध्या सहावीत शिकत असून ती अमेरिकेत वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे पलकची आजी मधुश्री दम्माणी यांना कर्करोग जडला होता. केमोथेरपीमुळे त्यांच्या डोक्‍यावरील केस गळाले. अशीच स्थिती बहुधा कॅन्सरग्रस्तांची होते. ते पाहून पलकच्या बालमनावर परिणाम झाला. अमेरिकेत केमोथेरपी झालेल्या चिमुकल्या रुग्णांच्या विगकरिता चिल्ड्रेन फॉर हेअर लॉस ही संस्था कार्यरत आहे. पलकने दोनदा तिच्या डोक्‍यावरील केससुद्धा या संस्थेला दिले आहे. तेव्हापासूनच कॅन्सरग्रस्तांच्या वेदना पाहून त्यांच्यासाठी काही केले पाहिजे असे तिच्या मनात आले. त्यावेळी तिने मिळणाऱ्या पैशांची बचत करून तो पैसा कॅन्सरग्रस्तांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांना याबाबत कुठलीही माहिती नव्हती. ज्यावेळी इतर मुलामुलींप्रमाणेच पलक आपल्या आईवडिलांसोबत महागड्या हॉटेलमध्ये जात होती त्यावेळी तिच्या मनाला ते पटत नव्हते. पर्यायाने तिने आईवडिलांना तिच्या संकल्पाबाबत माहिती दिली आणि त्या सर्वांनी महागड्या हॉटेलमध्ये जाण्याचे टाळले, अनेकदा तर तिने व्हिडीओ गेम्ससाठी मिळालेले पैसेसुद्धा खर्च केले नाही. रक्षाबंधन, दीपावली या सणांना ज्येष्ठांकडून मिळणाऱ्या खाऊचे पैसेसुद्धा तिने स्वतःकडेच ठेवले आणि पाहता पाहता दीड वर्षांत एक लाखाची रक्कम पलकने जमा केल्याचे पाहून आईवडील व कुटुंबीयांनासुद्धा आश्‍चर्य वाटले. दोनच दिवसांपूर्वी अमरावतीला आलेल्या पलकने डॉ. ब्रिजेश दम्माणी, जयकिशन दम्माणी, श्‍यामसुंदर दम्माणी, सुरेश दम्माणी यांच्या सहाय्याने 10 कर्करुग्णांना औषधोपचारासाठी एक लाखाची मदत करीत खारीचा वाटा उचलला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT