etapalli
etapalli 
विदर्भ

एटापल्लीमध्ये आढळली जिल्हा बंदचे आव्हान करणारी नक्षली पत्रके

मनोहर बोरकर

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील हालेवार पोलिस स्टेशन हद्दीतील माता चंद्राखंडी मंदिर देवस्थानापासून कारमपल्ली गावापर्यंत मुख्य रस्त्यावर शुक्रवारी (ता.17) मध्यरात्री दरम्यान नक्षल्यांनी पत्रके टाकून गेल्या महिन्यात जहाल महिला माओवादी रामको नरोटी व शिल्पा दूर्वा यांना पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार केल्याच्या निषेधार्थ 19 मेला (रविवार) जिल्हा बंद पाळून घटनेचा व शासनाच्या धोराणांचा निषेध नोंदवण्याचे आव्हान करणारे माडिया आदिवासी भाषेतील पत्रके आढळून आली आहेत.

सदरची पत्रके तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजूरांना शनिवारी (ता. 18) सकाळी दरम्यान आढळून आली, रामको व शिल्पा या दोन्ही महिला माओवादी भामरागड तालुक्यात पोलीस नक्षल चकमलकित ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र नक्षल्यांनी वेळोवेळी पत्रके व बँनरमधून रामको व शिल्पा या दोघीनाही पोलिसांनी धोक्याने पकडुन ठार केल्याचे म्हटले असून घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

गेली अनेक दिवसात नक्षली धुमाकुळ सुरु असून गडचिरोली बंद ठेवण्याचे आव्हान करणारी पत्रके जिल्ह्यात सर्वत्र टाकून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT