पांढरी : कुचकामी असलेली येथील पाण्याची टाकी.  
विदर्भ

पांढरीवासींच्या नशिबी नळाचे पाणी नाही, वारंवार करावी लागते पाण्यासाठी भटकंती

जितेंद्र चन्ने

पांढरी (जि. गोंदिया) : सन २०१५-२०१६ मध्ये पांढरी येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करून पाण्याची टाकी तयार करण्यात आली. नंतर गावात पाइपलाइनचे काम करण्यात आले. सुरुवातीला नळांतून सुरळीत पाणीपुरवठा होत होता. परंतु, सद्यःस्थितीत ही नळयोजना पांढरा हत्ती ठरली आहे. कधी सुरू तर, कधी बंद अशी अवस्था या नळयोजनेची झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, त्यांच्यावर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येऊ नये, याकरिता येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळ योजनेचा मुहूर्त काढण्यात आला. एक लाख लिटर पाणी क्षमतेची पाण्याची टाकी येथे बांधण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. परंतु, हा आनंद अल्पकाळ राहिला.

उल्लेखनीय म्हणजे, पाइपलाइनची फिटिंग व्यवस्थित न करण्यात आल्याने गावकऱ्यांनी कंत्राटदाराला विरोध दर्शविला होता. मात्र, स्थानिक प्रशासन व काहींनी लक्ष दिले नाही. परिणामी, नेहमी पाइपलाइन लिकेज राहत होती. कित्येक दिवस पाणीपुरवठा बंद असायचा. इतक्‍या वर्षांनंतर आजही तीच अवस्था आहे.

बिघाड असल्याने काही दिवस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कधी पाइपलाइन लिकेज असते; तर कधी मोटार जळालेली असते. मग पाण्याची समस्या मार्गी कशी लावावी, असा प्रश्‍न नागरिकांमध्ये आहे.

पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा

पावसाळ्यात कित्येकदा दूषित पाणीपुरवठा होत असते. याबाबतच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे केल्या जातात. मात्र, ग्रामपंचायत तक्रारींना केराची टोपली दाखवत असते. दरम्यान, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हातपंपच बरे होते

एक कोटीच्या वर रुपये खर्चून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात आले आहे. जर दररोज पाणी नळधारकांना मिळू शकत नाही, तर यापेक्षा हातपंपच बरे होते, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT