file photo
file photo 
विदर्भ

शिकवणी चालकांच्या "कॉल्स'मुळे पालक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : "हॅलो ऽऽ अभिनंदन! तुमच्या मुलीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत खूप छान गुण मिळविले. तिचे भविष्य अतिशय उत्तुंग असून, आम्ही तिला मोफत कोचिंग देण्यास तयार आहोत. अशाच हुशार विद्यार्थ्यांची आम्हाला गरज आहे. यासाठी तुम्हाला केवळ आमच्या संस्थेला भेट देऊन, प्रवेश निश्‍चित करावा लागेल.'' दिवसाला या प्रकारच्या पाच-सहा अनाहूत आणि अवेळी "कॉल्स'मुळे पालक त्रस्त झाले आहे. अखेर त्यांनी "सकाळ'कडे धाव घेतली आहे.
दहावी-बारावीच्या निकालाला महिना उलटला. अकरावी, तंत्रनिकेतनसह विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. संस्थांकडून मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. येथूनच, उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे फोन क्रमांक आदी डेटा जमा केला. तो "कोंचिंग क्‍लासेस'कडे पुरविलेला असू शकतो, असा संशय त्रस्त पालकांनी व्यक्त केला.
ऑनलाइन सर्चिंगच्या डेटाचाही वापर
निकालानंतर विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रम "ऑनलाइन' शोधण्याचा प्रयत्न केला. करिअरचे विविध मार्ग तपासून पाहिले. यावरही नजर ठेवत खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांनी पालक आणि विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक मिळविल्याची माहिती एका क्‍लासेसच्या संचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. इतर शहरात प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना तर खासगी कोचिंगसह, निवास, मेस आणि इतर सुविधांबाबतही फोन कॉल्स आणि मेसेज येत असल्याचे पालकांनी सांगितले.
शिक्षण विभागाच्या डोळ्यात धूळफेक
केवळ उत्तीर्ण होण्याला काही महत्त्व नाही. तर जादा गुण मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी खासगी शिकवणीसाठी शहरांकडे धाव घेत आहेत. नागपूरमधील काही कोचिंग क्‍लासेस चालकांनी मोठ्या गावात व तालुक्‍याच्या ठिकाणी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. तर काही स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांनीही रोजगार म्हणून या व्यवसायाला सुरुवात केली आहे. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला असला तरी त्याबरोबरच काही नामांकित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून खासगी कोचिंग क्‍लासेसची दुकानदारी चालवीत आहेत. शिक्षण विभागाला अंधारात ठेवून भरपूर पैसे कमावणाऱ्या या शिक्षकांनी आता जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायला सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT