यवतमाळ : प्रतीकला "अनाथांची आई' हे पुस्तक भेट देऊन गौरव करताना शिवसेनेचे यवतमाळ विधानसभाप्रमुख संतोष ढवळे.
यवतमाळ : प्रतीकला "अनाथांची आई' हे पुस्तक भेट देऊन गौरव करताना शिवसेनेचे यवतमाळ विधानसभाप्रमुख संतोष ढवळे. 
विदर्भ

मुलांच्या शिक्षणासाठी आईवडील कर्जबाजारी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जीवनात आपल्या वाटेला आलेल्या वेदना मुलांच्या वाटेला येऊ नये, हीच तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यासाठी ते "वाट्टेल ते' करायला तयार असतात. वेळप्रसंगी पोटाला पीळ देऊन कर्जबाजारी होऊन मुलांना जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र देतात. मुले अभ्यासात हुशार असलेली पाहून शेतमजुरी करणाऱ्या आईवडिलांनी काबाडकष्ट करून मुलांच्या शिक्षणाची वाट सुकर केली. मोठ्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या अवाढव्य खर्चामुळे ते कर्जबाजारी झाले. तर, धाकट्या प्रतीकने वैद्यकीय पात्रता परीक्षेत (नीट) 607 गुण मिळविल्याने आता त्याच्याशी एमबीबीएस प्रवेशाची त्यांना काळजी लागली आहे.
प्रतीक दादाराव इंगळे असे त्या होतकरू विद्यार्थ्याचे नाव. दिग्रस तालुक्‍यातील जेमतेम हजार लोकवस्तीचे धानोरा (खुर्द) हे गाव. वडिलांकडे केवळ दोन एकर शेती. त्यातून उत्पन्न येण्याची कोणतीही शाश्‍वती नाही. मुले शिकली पाहिजेत, या विचाराने झपाटलेल्या दादाराव व अर्चना इंगळे या दाम्पत्याने स्वत:ला मजुरीच्या कामाला जुंपले. मोठा मुलगा दीपक पुणे येथील ससून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. त्याच्या शिक्षणाचा खर्च करता करता कुटुंब आर्थिक बोजाखाली दबले. प्रतीक दिग्रसच्या दिनबाई विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला. त्याला 96.20 टक्के गुण मिळाले होते. मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून मेडिकलला जायचं, या ध्येयाने झपाटलेल्या प्रतीकने सातारा जिल्ह्यातील मसवळ येथे अकरावीला प्रवेश घेतला. पश्‍चिम महाराष्ट्रातील मुलांना मुंबई, पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी 70 टक्के कोटा असतो, हे त्याच्या प्रवेश घेण्यामागील प्रमुख कारण. फिजिक्‍स, केमिस्ट्री, बायोलॉजीची तयारी लातूर येथील शिकवणी वर्गातून पूर्ण केली. त्याला धानोरा येथील साहेबराव पाटील यांनी आर्थिक मदत केली. इयत्ता बारावीत 79 टक्के तर "नीट'मध्ये 607 गुण मिळालेल्या प्रतीकला बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे 'एमबीबीएस'ला प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. मुलांना शिकविताना वडिलांवर साडेचार लाखांचे कर्ज झाले. आता आपल्या स्वप्नाला आकार मिळणार की नाही, ही भीती प्रतीकला वाटते आहे. मदतीच्या अपेक्षेने त्याने शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे यांची भेट घेतली. समाजात सामाजिक जाणीव असलेला डॉक्‍टर निर्माण व्हावा, यासाठी दानशुरांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे, त्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक प्रतीकच्या पाठीशी उभे असल्याचे ढवळे यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात "एमबीबीएस'पदवी घेऊन एमडी करायचे आहे. प्रत्येक घरातून एक मुलगा शिक्षित झाला पाहिजे. रुग्णसेवेसोबतच सामाजिक संस्था तयार करून लोकांना मदत करायची इच्छा आहे. आर्थिक अडचणीमुळे डॉक्‍टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याबाबत मात्र मनात शंका आहे.
-प्रतीक इंगळे
विद्यार्थी, धानोरा (खुर्द)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT