patients are in dangerous situation due to late for corona testing in yavatmal
patients are in dangerous situation due to late for corona testing in yavatmal 
विदर्भ

टायफाईड अन् व्हायरलच्या नावाखाली रुग्णांची दिशाभूल; चाचणीसाठीही होतोय विलंब, रुग्णांचे जीव धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय, दिवसेंदिवस मृत्यूचा आलेखही वाढत आहे. यामागील कारणांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागाने आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कुठेतरी कमी पडते, असे चित्र पाहायला मिळत आहे. नवीन आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे प्राधान्याने लक्ष दिल्यास बाधितांची संख्या व मृत्यूचा आलेख कमी करणे सोपे होईल, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

सध्या वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, तोंडाची चव जाणे ही साधारणतः कोरोनाची लक्षणे समजली जातात. असे रुग्ण जेव्हा खासगी डॉक्‍टरांकडे तपासणीसाठी जातात तेव्हा त्यांना टायफाईड असेल, व्हायरल असेल असे सांगूनच उपचार केले जातात. त्यात रुग्णांचा वेळ वाया जातो. दुसरीकडे रुग्णांना तातडीने कोरोना चाचणी करण्याबाबत सल्ला दिला जात नाही. अशा रुग्णांची उपचारासोबतच तातडीने कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. अनेक रुग्ण उपचार सुरू करतात व बरे होण्याची प्रतीक्षा करतात. त्यात वेळ वाया जातो. रुग्णाची प्रकृती ढासळत जाते. तो जेव्हा कोरोनाची चाचणी करतो, त्याला विलंब झालेला असतो. शिवाय, कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केल्यास त्याचे रिपोर्ट यायला तीन ते सहा दिवसांचा विलंब होत आहे. साधारणतः या प्रकारात रुग्णाचा अतिशय महत्त्वाचा वेळ वाया जातो. योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाला लक्षणे दिसायला लागतात. त्यात त्याच्या प्रकृतीला धोका निर्माण होतो. 

अनेक रुग्ण उशिरा कोवीड सेंटरमध्ये आल्यामुळे ते गंभीर झाल्याची बाब डॉक्‍टर सांगतात. रुग्ण पहिल्या पाच दिवसांत आला तर डॉक्‍टरांना त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करून धोक्‍याची पातळी येण्यापूर्वीच रुग्णाला बरे करणे सोपे जाते. अशा रुग्णांवर खर्चही कमी होतो. कोरोनाचा कालावधी साधारणतः 14 दिवसांचा असतो. त्यामुळे लवकरच उपचार सुरू होणे गरजेचे असतात. परंतु, असे होताना दिसत नाही. याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. बऱ्याच वेळा कोवीड-19 चा रुग्ण स्वॅब दिल्यानंतर रिपोर्ट यायचा आहे म्हणून गावभर फिरत असतो. त्याच्यापासून अनेकांना लागण होत असते. ज्यांना कोवीडची लक्षणे आहेत, अशा लोकांनी विलगीकरणात राहणे गरजेचे आहे. तर, एकाच कुटुंबात सर्व सदस्य बाधित निघाल्यावर त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एकतरी सदस्य बाहेर पडतो. अशावेळी गृहविलगिकरणात असलेली व्यक्ती बाहेर फिरू नये यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे हाच सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. ही साखळी तोडण्याची जबाबदारी असलेली आरोग्य यंत्रणा कार्यालयातून बाहेर पडताना दिसत नाही. कोरोना रुग्णांच्या घरापर्यंत फक्त आशा वर्कर जाऊन माहिती भरत आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग तर होतानाच दिसत नाही. प्रत्येक कोरोना रुग्णांची हिस्ट्री तयार होऊन कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

भीतीमुळे कोरोना चाचणीकडे पाठ -
लोकांच्या मनात कोरोनाबाबत प्रचंड भीती आहे. कोरोना झाल्यावर समाज वाळीत टाकेल. कोणी मदतीला येणार नाही. कोरोना म्हणजे साक्षात मृत्यू असा समज लोकांनी करून ठेवला आहे. हे अर्धसत्य असून कोरोनासोबत लढण्याची मानसिकता लोकांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. लोकांनी न घाबरता कोरोना रुग्णांकडे सहानुभूती व मदतीच्या भावनेतून बघणे गरजेचे आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांनी कोरोना चाचणीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. यासाठी लोकांचे समुदनदेशन होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष -
शासकीय व खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे रिपोर्ट सी एस कार्यालयाला कळविला जातो. त्यामुळे रुग्णाला कोवीड सेंटरला भरती करणे, त्याच्यावर उपचार करणे ही जबाबदार सी एस कार्यालयाकडे असते. परंतु, सी एस कार्यालयाकडे रुग्णाला विलंबाने कळविले जाते. तोपर्यंत रुग्ण खासगी किंवा कोवीड सेंटरला भरती झालेला असतो. त्यानंतर पुढील कारवाई केली जाते. यात जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सुद्धा तोकडी पडत असल्याचे लोकांचे अनुभव आहे. ज्या विभागाकडून लोकांना तातडीची मदत मिळणे व मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, तो विभागच लोकांपर्यंत पोहोचण्यात सक्षम दिसत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून कोरोना रुग्णांना तातडीने समुदेशन होणे, आवश्‍यक ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT