patvadi 
विदर्भ

खास वऱ्हाडी चमचमीत पाटोडीचा रस्सा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : प्रत्येक प्रांताची आपआपली खाद्यविशेषता असते. पाटोडीचा रस्सा ही विदर्भातली खास भाजी. ती चवीला जितकी चमचमीत, तितकीच बनवायला किचकट आहे. जाणून घेऊया त्याची रेसिपी

पाटोडीच्या रस्श्यासाठी तीन प्रकारचे मसाले तयार करावे लागतात.

साहित्य सारणासाठी

सारण मसाला

कांदे २ मध्यम आकाराचे, १ वाटी बटाट्याचा कीस, खसखस १ चमचा, तीळ १ चमचा, धणेपूड १/२ चमचा, गोडा मसाला पाव चमचा, मीठ गरजेनुसार, तेल गरजेनुसार.

पाटोडी मसाला
१ वाटी बेसन, लसूण पाकळ्या ३ ते ४, जिरे १/२ चमचा, लाल मिरची पावडर १ चमचा, हळद चिमूटभर, मीठ गरजेनुसार, तेल गरजेनुसार.

रस्सा मसाला 
कांदे २ मध्यम आकाराचे, १ वाटी खोबऱ्याचा कीस, लसूण पाकळ्या ३ ते ४, लाल मिरची पावडर १ चमचा, हळद चिमूटभर, धणेपूड १/२ चमचा, गोडा मसाला पाव चमचा, मीठ गरजेनुसार, तेल गरजेनुसार.


सारणाचा मसाला 
प्रथम कांदे किसून घ्यावे व ते तव्यावर लाल होईपर्यंत परतून घ्यावे, नंतर त्यात किसलेले सुके खोबरे टाकून कांद्यासोबत परतून घ्यावे. नंतर त्यात खसखस, तीळ, मीठ, धणेपूड, गोडा मसाला टाकावा. वरून थोडे तेल टाकावे. सर्व एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे. हा सारणाचा मसाला तयार झाला.

पाटोडी मसाला 
पाटोडी तयार मसाला, लसूण पाकळ्या, जिरे, लाल मिरची पावडर, हळद, मीठ सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक करावे.

रस्सा मसाला
रस्सा तयार मसाला- प्रथम कांदे भाजून घ्यावे, खोबऱ्याचा कीस तव्यावर भाजून घ्यावा. मग भाजलेले कांदे, खोबऱ्याचा कीस, लसूण, लाल मिरची पावडर, हळद, गोडामसाला, धणेपूड हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करावे.

कृती
पाटोडी : कढईमध्ये तेल टाकून त्यात पाटोडी मसाला टाकावा. नंतर त्यात १ वाटी पाणी घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात १ वाटी बेसन घालावे व ते चमच्याने ढवळत राहावे. नाही तर त्यात गुठळ्या होण्याची शक्यता असते. पाण्याची गरज वाटल्यास गरम पाणी वापरावे. सारण मऊसर शिजल्यावर तेलाचा हात लावून त्याचे छोटे गोळे करावे व ते चपातीसारखे लाटून घ्यावे. नंतर सारणाचा मसाला पसरवून घडी करून घ्यावी व सुरीने छोटे-छोटे तुकडे करून घ्यावे.

रस्सा : रश्श्यासाठी तयार केलेला मसाला कढईत तेलात परतून घ्यावा. त्यात थोडे बाजरीचे पीठ घालावे, म्हणजे रस्सा दाट होईल. चवीपुरते मीठ घालावे. गरजेपुरते पाणी घालावे. मंद आचेवर ५ मिनिट शिजू द्यावे. वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.
टीप : पाटोड्या नुसत्या छान लागतात किंवा रश्श्यात टाकून गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खाव्यात.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT