file Photo
file Photo 
विदर्भ

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना दंड 

सकाळ वृत्तसेवा


नागपूर  : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत 325 प्रकरणांत 73 लाख 4 हजार 378 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे दारू पिणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. यात सावजी धाबे तसेच विविध 13 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून, 84 दारू पिणाऱ्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने 43 जणांना 80 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. 
अवैध दारूविक्री प्रकरणात 341 लोकांना अटक व 29 वाहने जप्त करण्यात आली. तसेच 212 लिटर विदेशी व 8600 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील सर्व सीमा सील केल्या आहेत. 24 तास तपासणी पथक तैनात केले आहे. आठ भरारी पथके सज्ज आहेत. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या 38 आरोपींना प्रत्येकी 2 हजार रुपये, तीन आरोपींना एक हजार व तीन आरोपींना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी 15 दारू दुकानांची आकस्मिक तपासणी केली. अवैध दारूविक्रीसंदर्भात तक्रारीसाठी स्वतंत्र टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित केला आहे. जनतेला अवैध विक्री अथवा वाहतुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी 1800833333 या टोल-फ्री क्रमांकावर 8422001133 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावरही माहिती दिल्यास तत्काळ कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT