people demand to give speed beaker on tumsar bapera road in sihora of bhandara 
विदर्भ

तुमसर-बपेरा मार्गावर क्षणाक्षणाला दिसतोय मृत्यू, गतिरोधक देण्याची मागणी

सहदेव बोरकर

सिहोरा (जि. भंडारा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावर भरधाव वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे वाहतूक करणाऱ्या नागरिकांना क्षणाक्षणाला मृत्यू जवळ आल्याचा भास होतो. दरम्यान, संभावित अपघात टाळण्यासाठी या राज्य मार्गावर गतिरोधक देण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला केली आहे. 

तुमसर-बपेरा राज्य मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. गावातील घरे राज्यमार्गालगत असल्याने नागरिक आणि लहान मुलांचा वावर या राज्य मार्गालगत आहे. राज्य मार्गावरून वाहनांची भरधाव वर्दळ सुरू असल्याने भीती निर्माण झाली आहे. सिंदपुरी ते बपेरापर्यंत राज्य मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. सिहोरा ते डोंगरला गावापर्यंत राज्य मार्गाच्या कडेला झुडपे वाढले आहेत. यामुळे दुहेरी वाहतूक अडचणीत येत आहे. परंतु, राज्यमार्ग दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत संताप आहे. राज्यमार्ग खड्ड्यात गेला असल्याने नागरिकांत आक्रोश आहे. 

दरम्यान, राज्यमार्ग दुरुस्तीच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी नसल्याची माहिती मिळाली आहे. या राज्यमार्गाचे दुरुस्ती व नव्याने बांधकाम करण्यासाठी इ निविदा अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, यातही निधीची आडकाठी आली आहे. राज्य मार्ग दुरुस्तीकरिता निधी नाही. परंतु, झुडपे स्वच्छ करण्यात येत नाही. यामुळे राज्यमार्गावर अपघात वाढत आहेत. राज्य मार्गावरील प्रवास नागरिकांचे जिवावर बेतला आहे. तथापि, अपघात टाळण्यासाठी या राज्यमार्गावर गतिरोधक देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

गावातील रस्तेदेखील गेले खड्ड्यात -
सिहोरा परिसरात राज्यमार्गाला जोडण्यात आलेली ग्रामीण भागातील रस्तेदेखील खड्ड्यात गेले आहेत. रस्त्याने पायी चालणेही मुश्‍कील होत आहेत. चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातून माडगी ते बपेरा मार्ग गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत आहे. या मार्गात तीन जिल्हा परिषद क्षेत्र येत आहेत. परंतु, रस्त्याची अवस्था खड्डेमय झाली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ग्रामीण रस्तेसुद्धा जीवघेणे झाले असून, रस्ता दुरुस्तीची मागणी कर्कापूरचे सरपंच प्रल्हाद आगाशे यांनी केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT