kyanite mine e sakal
विदर्भ

३० वर्षांपासून गावात स्मशान शांतता, कधी सुरू होणार खाण?

सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्यातील दहेगाव (dahegaon of bhandara) या गावाचे नाव भूगोलाच्या पुस्तकातही आहे. येथे खाणीतून कायनाईटचे (kyanite mine) उत्पादन होत असल्याने परिसरात लोकांची रेलचेल होती. मात्र, आता या गावात स्मशान शांतता पसरली आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी कायनाईट खाण ३० वर्षांपासून बंद पडली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावातील मजुरांना रोजगारासाठी वणवण भटकावे लागत आहे. आता ही खाण पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी ३० जुलैला कामगारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. (people demanded to reopen kyanite mine in dahegaon of bhandara)

भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर १२०० लोकसंख्येचे दहेगाव येथे सध्या ठिकाणी झुडपी जंगल असलेल्या भागात ३० वर्षांपूर्वी कायनाईट नावाचा मॅगनीज दगड काढण्याची खाण होती. मात्र, १९९० ला दहेगाव येथील खाण कायमस्वरूपी बंद करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील युवक व कामगारांचा रोजगार हिरावला गेला. यासंदर्भात गेल्या ३० वर्षांपासून कोणताही लोकप्रतिनिधी वा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेऊन साधी विचारपूसही केली नाही.

ग्रामपंचायतींचे ठराव मंजूर -

आता ही कायनाईटची खाण शासनाने सुरू करण्यासाठी परिसरातील पुढारी व सर्व ग्रामपंचायतींनी शासनाला ठराव पाठविले आहेत. लवकर कायनाईट खाण सुरू होऊन पुन्हा दहेगावात रेलचेल सुरू व्हावी अशी, अपेक्षा गावकरी करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालू चुन्ने यांनी पुढाकार घेऊन काही दिवसांपासून दहेगाव खाण सुरू करण्याबाबत मोहीम राबविली आहे. त्याबाबत ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन प्रशासकीय यंत्रणेकडे पाठविले आहेत. येत्या 30 जुलैला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.

दहेगाव येथील खाण १९९२ ला बंद झाली आहे. या खाणीत परिसरातील अनेक गावातील तीन हजार मजुरांना काम मिळत होते. रेल्वेद्वारे अर्जुनी मोरगाव येथून मुंबई व भिलाई येथे खनिज पाठविले जात होते. ही खाण बंद पडल्यामुळे परिसरातील लोकांना कोणताही रोजगार मिळत नाही. त्यामुळे मागील२०१९-२० पासून दहेगाव येथील खाण सुरू करण्यासाठी २७ ग्रामपंचायतींनी राज्य शासनाला ठराव पाठविले आहेत. ही खाण सुरू करण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू असून ३० जुलैला बारव्हा येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
-बालू चुन्ने, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, लाखांदूर.
दहेगाव येथील खाण सुरू होती तेव्हा तीन रुपये रोजीपासून तेथे काम केले होते. २५ वर्षे काम केल्यावर अचानक खाण बंद करण्यात आली. त्यामुळे आम्हाला कोणताही रोजगार मिळत नाही. त्यामुळे कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. आता पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करावे लागते. खाणीचे काम सुरू झाले तर, आमच्या मुलांना काम मिळण्याची आशा आहे.
-रामा पर्वत, खाण कामगार, दहेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT