water scarcity
water scarcity e sakal
विदर्भ

पावसाळ्याच्या तोंडावरही मेळघाट तहानलेलाच, २५० गावांमधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एकीकडे कोरोना; तर दुसरीकडे मेळघाटातील नागरिक पाणीटंचाईमुळे (water scarcity issue in melghat) होरपळत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावरच जवळपास २५० गावांमधील नागरिक पाणीटंचाईशी सामना करीत आहेत. सध्या चिखलदरा तालुक्यात (chikhaldara of amravati) १८ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासोबतच ८२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाचे टंचाईमुक्तीचे दावे फोल ठरले आहेत. (people from 250 village facing water scarcity issue in melghat of amravati)

विशेष म्हणजे, मेळघाटच्या अनेक गावांना दर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. असे असतानाही कायमस्वरूपी उपाययोजनेच्या बाबतीत अद्यापही ठोस हालचाली करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हापरिषदेचा यंदाचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा जवळपास १५ कोटींचा आहे. जूनपर्यंत पाणीटंचाईची धग कायम असते, प्रामुख्याने दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा, धारणी या दोन तालुक्यांतील बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सद्यःस्थितीत चिखलदरा तालुक्यात १७ व चांदूररेल्वे तालुक्यातील एका गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात टँकरची ही संख्या १२ होती. ती आता वाढून १८ झाली आहे. आता पावसाळा सुरू होणार असला; तरी अद्याप अनेक ठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे.

टँकर सुरू असलेली गावे -

सावंगी मग्रापूर, एकझिरा, लवादा, आलाडोह, आकी, मलकापूर, सोमवारखेडा, मोथा, धरमडोह, बहाद्दरपूर, तारुबंधा, तोरणवाडी, बगदरी, सोनापूर, रायपूर, पाचडोंगरी, कोयलारी, सावऱ्या, आवागड.

यंदा पाणीटंचाई निर्मूलनार्थ सुरुवातीपासूनच उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या; त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेने यंदा टँकरची गावे कमी आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने उपाययोजना सुरू आहेत.
- राजेंद्र सावळकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT