बोर्डी  
विदर्भ

काय सांगता! स्मशानभूमीतील फुले घराच्या देवालयात; अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत भजन कीर्तन

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : स्मशानभूमीतील फुले पुजेसाठी घरात नेणे अशूभ मानले जात होते. मात्र आता बोर्डी गावातील नागरिकांनी अंधश्रद्धेला फाटा देत मनातील अंधश्रद्ध दूर करून स्मशानभूमीतील फुले पुजेसाठी घराघरात घेऊन जात आहेत. या स्मशानभूमीत जवळपास दीडशे प्रकारच्या विविध प्रजातींची झाडे आहेत. या स्मशानभूमीत दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे बोर्डीची स्मशानभूमी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरली आहे.

स्मशानभूमीत वाढदिवस, भोजन, सत्कार, कीर्तन अन्‌ प्रबोधन हे ऐकून कुणालाही आश्‍चर्याचा धक्का बसेल. मात्र हे खरे आहे. अचलपूर तालुक्‍यातील बोर्डी या छोट्याशा गावाच्या स्मशानभूमीत कोणी पाहिले नसेल आणि ऐकले नसेल, असे कार्यक्रम नेहमीच होत आहेत.

यावर्षीसुद्धा तीन एप्रिलला वाढदिवस, विद्यार्थ्यांसह देहदान करणाऱ्यांचा सत्कार असे आदी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबाडेकर यांनी सांगितले. या दीड हजार लोकसंख्येच्या गावात स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आणि याठिकाणी होणारे वेगवेगळे कार्यक्रम अनेकांच्या औत्सुक्‍याचे विषय ठरत आहेत. कोणत्याही गावाची स्मशानभूमी म्हटले की अंत्यसंस्काराची अशीच ओळख असते. मात्र बोर्डी येथील संत कबीर स्मशानभूमीत सुविचार फलक, दानपेटी, भजन-कीर्तन, प्रबोधन आणि बुद्धवंदनेसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदनाही म्हटली जाते, हे विशेष.

या स्मशानभूमीत दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. गावात ही एकच स्मशानभूमी असल्याने गावकऱ्यांमध्ये आपसात कुठलाच भेदभाव नाही. येथील प्रत्येक समाजाच्या मृत व्यक्तीवर याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. येथील कार्यक्रमामुळे ही स्मशानभूमी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

मंदिरासारखी स्मशानात दानपेटी

येथील स्मशानभूमीत छान उद्यान तयार करून सुविचार फलकावर संतांचे विचार लिहिलेले आहेत. सोबत बसण्यासाठी बेंचेस आणि झुलाही आहे. विशेष म्हणजे मंदिरासारख्या दानपेट्याही येथे ठेवण्यात आल्या आहेत. या दानपेटीतील रक्कम स्मशानभूमीच्या देखभाल व विकासासाठी वापरण्यात येते.

अंधश्रद्धा दूर होऊन मनातील भीती नष्ट व्हावी आणि चांगले विचार समाजात रुजावेत, यादृष्टीनेस्मशानभूमीत दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. याहीवर्षी वाढदिवस, सत्कार आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, गावकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-रमेश अंबाडेकर, सामाजिक कार्यकर्ता, बोर्डी.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT