perilous journey through flood of pregnant women chandrapur sakal
विदर्भ

प्रसूतीसाठी पुरातून जीवघेणा प्रवास...

रस्ते बंद झाल्याने होडीचा आधार; रुग्णालयात सुखरुप

संदीप रायपुरे

गोंडपिपरी/धाबा (जि. चंद्रपूर) : प्रसूतीची तारीख आली अन् कुटुंबीयांची चिंता वाढली. तीन दिवसांपासून सततचा पूर व रस्तेबंद असल्याने आता काय करावे, हा प्रश्न उभा ठाकला. शेवटी जीव संकटात टाकत गर्भवतीला घेऊन आशा सेविकेने होडीने प्रवास केला. वेडगाव-सकमूर या मार्गावरून पावसाच्या यातना दाखविणारा हा प्रकार समोर आला. नवीन पोडसा (ता. गोंडपिपरी) येथील पिंकू सुनील सातपुते या गर्भवती आहेत. त्यांना प्रसूतीसाठी गोंडपिपरीतील ग्रामीण रुग्णालयात भरती व्हायचे होते. पण, तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. गोंडपिपरीला जाण्याचे रस्तेही बंद होते. वेडगाव-सकमूर या मार्गाला बेटाचे स्वरूप आले. अशा स्थितीत काय करावे, हा प्रश्न होता.

महिलेची अवस्था व गंभीरता लक्षात घेता शेवटी एक नावाडी तयार झाला. पिंकू सातपुते हिच्यासह आशासेविका संगीता ठाकूर, कुटुंबातील सदस्य होडीतून निघाले. वेडगाव ते सकमूरपर्यंत होडीने प्रवास करीत त्या शेवटी गोंडपिपरीला पोहोचल्या आणि कुटुंबीयांच्या जिवात जीव आला. वेडगावच्या आरोग्यसेविका मीना टिकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पिंकू सातपुते हिला चंद्रपूर जिल्हा सामान्य हलविले आहे.

आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष

सीमावर्ती भागातील वेडगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. पण, अनेक वर्षांपासून इथे वैद्यकीय अधिकारी नाही. कुठल्याही सोयीसुविधा नसल्याने या ठिकाणी प्राथमिक उपचार मिळणे कठीण आहे. ही बाब माहीत असूनही लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे वारंवार दुर्लक्षच केले आहे. याचा फटका सामान्यांना बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज अजित पवारांचा रोड शो

गरम अन्नासाठी Aluminum Foil किंवा Containers वापरता? ही सवय किडनीसह संपूर्ण आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT