The person killed in the tiger attack at Usegaon Gadchiroli  
विदर्भ

देसाईगंज​ तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात पहिला बळी

सकाळवृत्तसेवा

देसाईगंज (जि. गडचिरोली), ता. 28 : गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल रविवारी (ता. 27) घडली.

तालुक्यातील उसेगाव येथे ही घटना घडली. कालपासून शोधमोहिम राबविल्यानंतर आज 28 जानेवारी त्याचा मृतदेह हाती लागला आहे. पांडूरंग सयाम (वय 55) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.  सयाम व कुसन कापगते हे दोघे गुरे चारण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेले होते. मात्र सयाम यांच्यावार वाघाने हल्ला करून फरफटत जंगलात नेले.

सायंकाळी कापगते हे एकटेच गावात परतले. यामुळे गावकरी व वनविभागाच्या पथकाने कालपासून शोधमोहिम सुरू केली होती. काल रात्री 12 वाजतापर्यंत काहीच हाती लागले नाही. आज सोमवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास पुन्हा शोधमोहिम राबविली असता सयाम यांचा मृतदेह आढळून आला.

तालुक्यातील कोंढाळा - उसेगाव परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून वाघाचे वास्तव्य आहे. मात्र आजपर्यंत वाघाने मनुष्यहानी केली नव्हती. याआधी तीन गायींना वाघाने भक्ष्य बनविले होते. यामुळे आता वाघाची दहशत निर्माण झाली आहे. कासवी, उसेगाव, कोंढाळा परिसरात या वाघाचा वावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, भोसले घराण्याची उच्च न्यायालयात धाव, समितीवर मराठा इतिहासतज्ज्ञ नाही!

Mexican Style Street Corn Salad: सकाळच्या नाश्त्याला द्या झणझणीत पण हेल्दी ट्विस्ट! बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड

आजचे राशिभविष्य - 07 मे 2026

Panchang 7 May 2026 : आजचे पंचांग! रवियोगासह शुभ संयोग; कोणत्या वेळा आहेत लाभदायक?

SCROLL FOR NEXT