farmer  sakal media
विदर्भ

किटकनाशकाच्या फवारणीने धानाचे पीक उदध्वस्त

आपबिती सांगताना बळीराज्याचे डोळे पाणावले

विनायक रेकलवार

किटकनाशक औषधीच्या फवारणी मुळे शेतातील धानाचे उभे पीक उदध्वस्त झाले. त्यात पन्नास हजार रूप्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतीच्या उत्पन्नावर माझे जीवन होते. चुकीच्या पदधतीने औषधी देणा-या कृषी केंद्रावर आणि औषधी कंपनीवर कारवाई करावी. मला नुकसान भरपाई मिळावी अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तालुक्यातील फुलझरी येथील अल्पभूधारक शेतकरी रघुनाथ मोहूर्ले यांनी पत्रकार परिषदेत दिला. शेतातील उभे पीक उदध्वस्त झाल्याने मोहूर्ले यांची दिवाळी अंधारात सापडली. आपबिती सांगताना मोहूर्ले यांचे डोळे पाणावले.

मूल तालुक्यातील फुलझरी येथिल रघुनाथ मोहूर्ले यांची पत्नीच्या नावे दीड एकर धानाची शेती आहे.त्यांनी देवकी जातीच्या धान वानाची पेरणी केली.पीक जोमदार असताना नुकतेच धान पीकावर खोडकिडा रोगाने आक्रमण झाले.त्यामुळे त्यांनी 29 सप्तेंबर रोजी चिरोली येथील समिर कृषी कें्रदातून खोडकिडा रोगावर असणारी औषधांची मागणी केली. कृषी केंद्राचे संचालक बुक्कावार यांनी आपल्याला सानवेक्स 100 ग्रॅम,मोरटार 100 ग्रॅम,किफण 100 एमएल हे किटकनाशक दिल्याचे मोहूर्ले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.औषधीचे 1000 रूप्ये सुदधा दिले. दरम्यानच्या कालावधी मध्ये पाउस आणि तब्येत ठिक नसल्याने त्यांनी 16 ऑक्टोबर रोजी या किटकनाशक औषधांची फवारणी केली.

औषधी फवारणी मुळे खोडकिडा रोगाचा नायनाट होईल आणि आपल्याला चांगले पीक येईल अशी आशा त्यांना होती.परंतु काही दिवसातच त्यांना शेतातील उभेपीक जळत असल्याचे लक्षात आले. धान पीक जळाल्याने माझे जीवन आणि कुटुंबच उदध्वस्त झाल्याची व्यथा मोहूर्ले यांनी यावेळी सांगितली.चुकीच्या पदधतीने किटकनाशक औषधी देणा-या समिर कृषी केंद्रावर आणि औषधी कंपनीवर कारवाई करण्यात यावी. नुकसान भरपाई न मिळाल्यास तालुका कृषी विभागाच्या कुटुंबासह आमरण उपोषणास बसण्याचा ईशारा रघुनाथ मोहूर्ले यांनी दिला.

पत्रकार परिषदेला जानाळा येथील सरपंच रंजना भोयर,जितेंद्र आव्हाड युवा मंचाचे अध्यक्ष मंगेश पोटवार,राष्टवादी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष गौरव श्यामकुळे, उपसरपंच दर्शना किन्नाके,धनराज रामटेके,पुंडलिक ढोले,ईश्वर वाढई,रविंद्र भरापे,विनायक निकोडे,रविशंकर भोयर,मिथुन बोरूले,जितेंद्र बोरूले,समिर अल्लूरवार यांची उपस्थिती होती.

थातूरमातूर पंचनामा

रघुनाथ मोहूर्ले यांनी कृषी विभागाकडे तक्रार दिल्यानंतर कृषी विभागाच्या अधिका-यांनी थातूरमातूर पंचनामा केला.पंचनामा अहवाल वाचून न दाखविता त्यावर आमची स्वाक्षरी घेतल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.अधिकारी कृषी केंद्राच्या संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी मोहूर्ले यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT