file photo 
विदर्भ

तडीपारांचे छायाचित्र लावले भर चौकात

सकाळ वृत्तसेवा

अमरावतीः सार्वजनिक सण, उत्सवांसह निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होऊ लागला. सराईत गुन्हेगारांनी पोलिसांना हैराण करून सोडले. त्यामुळे आता अशा लोकांची छायाचित्रांसह माहिती सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली.
निवडणूक काळात शहर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शेकडो सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले, बरेच जण अजूनही रडारवर आहेत. अशा गुन्हेगारांचे छायाचित्र आतापर्यंत पोलिस ठाण्याच्या नोटीसबोर्डवर किंवा आवारात एखाद्या फलकावर झळकत होते. परंतु हेच सराईत जिल्ह्याबाहेर हद्दपार केल्यानंतर पुन्हा शहरात येऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात, सामान्य नागरिकांत दहशत निर्माण करीत असल्याने सार्वजनिक उत्सव व विधानसभा निवडणूक काळात अनेक ठिकाणी त्यांनी दहशत निर्माण केल्याचे दिसून येते. त्यातच खोलापुरीगेट हद्दीत आमलेवाडीत तिघा तडीपारांनी दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे विजयादशमीच्या दिवशी तीन घरांची जाळपोळ करून ऐवज लुटला होता. या सराईतांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर नेऊन सोडल्यावर पुन्हा ते परत येतात. परंतु त्यांच्याबद्दलची माहिती सामान्य नागरिक पोलिसांना देण्यास टाळाटाळ करतात. नागरिकांनी असे सराईत आढळल्यास त्यांची माहिती नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलिस ठाण्याला देण्यासाठी तडीपारांचे छायाचित्र आणि माहितीसोबतच काही फोन नंबरसुद्धा प्रसिद्ध केले आहे. गाडगेनगर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, विलासनगर चौक, आझादनगर चौकात फलक लावले आहे.

सार्वजनिक ठिकाणी असे सराईत आढळल्यास त्यांची माहिती पोलिसांना देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवल्या जाईल. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT