physically challenged man stopped Sanjay rathod vehicle in Yavatmal  
विदर्भ

अन् संजय राठोडांच्या गाडीपुढे झोपला दिव्यांग; जनता दरबाराच्या वेळी घडला धक्कादायक प्रकार 

सुहास सुपासे

दिग्रस (जि. यवतमाळ): शहरातील वैभव नगर परिसरातील रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच नगरसेवकांनी इतर काम न केल्याने आमदार संजय राठोड शहरातील विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता भेट न झाल्याने वैभव नगरातील एका दिव्यांगाने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी शासकीय विश्रामगृहातुन बाहेर निघता वेळी अडविल्याची घटना शुक्रवारी (ता.१९ मार्च)  दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली.  त्यामुळे एकच गोंधळ झाला होता.

आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी आमदार संजय राठोड हे दिग्रस शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिग्रस येथील विश्रामगृहात येत असतात. याठिकाणी शहरातील वैभव नगरातील भास्कर वाघमारे नामक एक अपंग आला होता. 

बराच कालावधी होऊन मात्र भास्कर वाघमारे व आमदार संजय राठोड यांची भेट न झाल्याने आमदार राठोड यांची गाडी विश्रामगृह बाहेरच्या दिशेने निघाली असता त्या दिव्यांगाने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी अडविली. अपंग वाघमारे गाडीपुढे झोपताच तेथे बघ्यांची गर्दी झाली. 

त्यानंतर पोलिसांनी वाघमारे यास उठवून आमदार राठोड यांचेकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ वैभव नगर येथे भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली. यावेळी आमदार राठोड यांनी थोड्या वेळात येतो असा शब्द दिला. मात्र नंतर ते शहरातील लोकार्पण सोहळ्यास निघून गेले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT