Pickup truck burned out in Rajura Chandrapur  
विदर्भ

तणीस वाहून नेणाऱ्या गाडीला अचानक झाला विजेच्या तारांचा स्पर्श; घडला थरार

श्रीकृष्ण गोरे

राजुरा (चंद्रपूर) :पोंभूर्णा येथून गोवरी येथे आलेल्या तनीस वाहून नेणाऱ्या पिकअप गाडीला  जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन आग लागून पूर्ण तणीस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.

पोंभूर्णा येथून पिकअप गाडी क्र. एम एच 34 बि जी 0620 गोवरी येथे तणीस घेऊन गोवरी येथील शेतकरी ऋषी लांडे यांच्या शेतात जातांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन पिकअप गाडीला अचानक आग लागली. आग लागताच परिसरातील शेतकऱ्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. 

राजुरा येथून अग्नीशामन दलालासुद्धा पाचारण करण्यात आले परंतू या पांदन रस्त्याने अग्नीशामन दलाची गाडी पोहचू शकत नसल्याने सदर गाडीतील आगीवर नियंत्रण आणण्यास मोठी अडचण निर्माण झाली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणले गेले परंतू गाडीतील तणीस वाचवू शकले नाही तर गाडीचेही जळून मोठे नुकसान झाले.  

सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी गाडी चालकांचे हात भाजून तो जखमी झाला आहे. या घटनेत गाडीचे  व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मदतीची मागणी केली जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT