file photo
file photo 
विदर्भ

Maharashtra vidhansabha 2019 प्रचार साहित्यातून प्लॅस्टिक बाद

सकाळ वृत्तसेवा


नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक बंदीचे आवाहन केले असून, दोन ऑक्‍टोबरपासून देशभरात प्लॅस्टिक बंदीसाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगानेही प्लॅस्टिकमुक्त निवडणुकीवर भर दिला आहे. निवडणूक आयोगाने प्रचार साहित्यात प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहन विविध राजकीय पक्षांसोबत उमेदवारांनाही केले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, विविध पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली. कॉंग्रेस, शिवसेनेने आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे या उमेदवारांनी आतापासून प्रचारासाठी दारूगोळा तयार करण्यावर भर दिला. मात्र, या निवडणुकीत उमेदवारांना प्रचार साहित्यात प्लॅस्टिकचा वापर टाळावा लागणार आहे. आतापर्यंत गेल्या अनेक निवडणुकीत उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून प्लॅस्टिकचे झेंडे, तोरण, बॅनर, होर्डिंग्स, कट-आउट, पोस्टर तयार केले जात होते. एकदा प्लॅस्टिकचे झेंडे, तोरण, बॅनर टिकाऊ असल्याने ते तयार केल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यावर खर्च होऊ नये, असा उमेदवारांचा हेतू होता. परंतु, त्यांना आता प्रचारासाठी प्लॅस्टिकऐवजी इतर पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने प्लॅस्टिकमुक्त निवडणुकीवर भर दिल्याने उमेदवार, राजकीय पक्षांना कागद, कापड आदीचे प्रचार साहित्य तयार करावे लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी टाळावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरूनही करण्यात आले आहे.
पिण्याच्या बॉटल्स, पाऊचवरही बंदी
उमेदवार तसेच राजकीय पक्षांकडून नेहमीच कार्यकर्त्यांना तसेच सभेत येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्लॅस्टिक बॉटलचे पाणी दिले जाते. एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये पिण्याच्या पाण्याची बॉटल, पाऊचचाही समावेश होतो. या बॉटल्स, पाऊच वापरणे टाळण्याचेही आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे यावेळी उमेदवार किंवा राजकीय पक्षांपुढे कार्यकर्त्यांना पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करून द्यावे, असा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT