PM Surya Ghar Yojana sakal
विदर्भ

PM Surya Ghar Yojana : ‘पीएम सूर्यघर’ ग्राहकांसाठी डोकेदुखी ; नॅशनल पोर्टलवर मिळत नाही ओटीपी, सवलतीचाही संभ्रम

केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना आता मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. यासाठी असलेल्या नॅशनल पोर्टलच्या वेबसाइटहून नवीन ग्राहकांना ओटीपी मिळवण्यात अडचणी जात असून महावितरणकडून समाधान करण्यात येत नसल्याने असंतोष निर्माण होऊ लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना आता मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. यासाठी असलेल्या नॅशनल पोर्टलच्या वेबसाइटहून नवीन ग्राहकांना ओटीपी मिळवण्यात अडचणी जात असून महावितरणकडून समाधान करण्यात येत नसल्याने असंतोष निर्माण होऊ लागला आहे. ही योजना दिशाभूल करणारी आहे का? असा सवाल आता विचारण्यात येऊ लागला आहे.

महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांना सौरऊर्जा निर्मितीद्वारे मोफत वीज मिळावी, यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली. यामध्ये तीन किलोवॅटपर्यंतचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते.

वाढते वीजदर व वापर बघता ग्राहकांनी या योजनेला प्रतिसाद दिला खरा, मात्र अल्पावधीतच त्यांचा हिरमोड होऊ लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नॅशनल पोर्टलची वेबसाइट संथ झाली असून नवीन जोडणी घेण्यासाठी आवेदन करणाऱ्या ग्राहकांना ओटीपी मिळवण्यात अडचणी जाऊ लागल्या आहेत. यामुळे योजनेचा लाभ कमी व मनस्ताप अधिक, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

देयक भरा, अन्यथा सोलर मीटर नाही

नवीन जोडणीसाठी ४० ते ४५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असताना तीन ते चार महिन्यांचा कालावधी झाल्यावरही प्रक्रिया अपूर्ण राहत आहे. अशाही स्थितीत प्रक्रिया पूर्ण झाल्यास पुढील दोन ते तीन महिने यापूर्वी येणारे नियमित देयक भरण्यास महावितरणकडून सांगण्यात येत आहे. ग्राहकांना सोलर पॅनल बसविल्यानंतर वीजबिल येणार नाही अपेक्षेपोटी नियमित आलेला बिल भरणा केला नाही, त्यामुळे आता महावितरणकडून ग्राहकांना वीजबिल भरणा करावाच लागेल, असे लिहून घेण्यात येत आहे. अन्यथा संबंधित ग्राहकांना सोलर वीज मीटर महावितरणकडून देण्यात येत नाही, त्याकरिता हमीपत्र ग्राहकांकडून घेणे सोलर वेंडर्सना बंधनकारक करण्यात आले आहे.

वेबसाइट लवकरच दुरुस्त करणार

वेबसाइटबाबत वीज ग्राहकांना आलेल्या अडचणींची दखल केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाने घेतली आहे. ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिल्यानंतर केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली व समस्या सोडविण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची तुकडी मुंबईत पाठविण्याचे मान्य केले, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Vitamin D deficiency: व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' 4 लक्षणे,करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT