File photo
File photo 
विदर्भ

सासरी जाऊन जावयाने घेतले विष, प्रकृती गंभीर

सकाळ वृत्तसेवा

अमरावती :कौटुंबिक वादामुळे माहेरी आलेल्या पत्नीने पतीसोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे जावयाने आपल्या सासऱ्याच्या घरासमोर उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अंबागेटच्या आत शनिवारी (ता. 12) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. जावयाला अखेर सासरे व पत्नीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणून दाखल केले. सहा महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला. लग्नानंतर सासरी काही दिवस बरे गेल्यावर घरी कौटुंबिक कारणावरून सासू, सुनेचा वाद सुरू झाला. त्यात सुनेवर काही आरोपही लावल्याची माहिती तिने बयाणात खोलापुरीगेट पोलिसांपुढे दिली. त्यामुळे विवाहिता अंबागेटच्या आत राहणाऱ्या आपल्या माहेरी परत आली. शुक्रवारी (ता. 12) पती पत्नीला सोबत घेऊन जाण्यासाठी सासरी आला. परंतु पत्नीने सोबत येण्यास नकार दिला. सासरी जाण्यापूर्वी जावयाने सोबत उंदीर मारण्याचे औषध आणि पेढा आणला होता. पेढ्यात उंदीर मारण्याचे औषध टाकून तो पेढा जावयाने खाल्ला. प्रकृती बिघडल्याने सासऱ्यासह पत्नीने त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. खोलापुरीगेट पोलिसांनी घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली.
आठवड्यापूर्वीच घडली होती घटना
आठवड्यापूर्वी जिल्ह्यातील एका गावात कौटुंबिक वादानंतर माहेरी आलेल्या पत्नीने त्याचवेळी सोबत येण्यास नकार दिला होता. त्यामुळे जावयाने सासऱ्याकडे जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT