File photo
File photo 
विदर्भ

शेतकरी मरते हो विषाच्या फवारणीनं..!

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ :

""सत्ताधाऱ्यांना चढली हो सत्तेची मस्ती
शेतकऱ्यांची जिंदगी झाली हो सस्ती,
कापसाचे बोंड पोखरले बोंडअळीने
शेतकरी मरते हो, विषाच्या फवारणीनं'',


वर्तमानस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवत अशोक भुतडा यांनी झडतीमधून शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
येथील आझाद मैदानात शुक्रवारी नगरपालिकेतर्फे या पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर नगरपालिकेतील बांधकाम सभापती विजय खडसे, नगरसेवक गजानन इंगोले, उद्धव साबळे, पंकज देशमुख, नित्यानंद गिरी, राजने, वैशाली कनाके, कीर्ती राऊत, प्रा. बबलू देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यात उत्कृष्ट ठरणाऱ्या एकूण दहा बैलजोड्यांसाठी 50 हजारांचे बक्षीस नगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आले. त्रिसदस्यीय समितीने या स्पर्धेचे परीक्षण केले. या परीक्षकांमध्ये ऍड. जयसिंग चव्हाण, ऍड. रवींद्र भुमरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांचा समावेश होता. पोळा म्हटले म्हणजे झडत्या आल्याच. याही पोळ्यात विविध झडत्या सादर करून शेतकऱ्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

""अनुदान गेलं कर्मचाऱ्यांच्या घरी
शेतकऱ्यांच्या हाती दिल्या तुरी'' अशा झडत्यांनी पोळ्याच्या उत्साहात रंगत आणली.
""दुस्काय रे दुस्काय, इदर्भाचा दुस्काय
त्या दुस्कायात कास्तकाराचे येले सुरू
कापूस, सोयाबीन, तुरीले नाई आला भाव
आता काय सायेब आमी, काय खाव''

बोरीअरब येथील नितीन कोल्हे यांची झडती नगरसेवक बबलू देशमुख यांनी सादर करून सरकारी धोरणांवर ताशेरे ओढले. याशिवाय संजय माघाडे, विठ्ठल राठोड यांनी झडत्या सादर करून शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट बैलजोडी विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन सुनील वासनिक यांनी केले. या स्पर्धेत एकूण 95 बैलजोड्या सहभागी झालेल्या होत्या.

संजय मादेशवार प्रथम क्रमांकाचे मानकरी
नगरपालिकेतर्फे आयोजित स्पर्धेत परिसरातील 95 बैलजोड्यांनी सहभाग नोंदविला. बेटी बचाव, स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण संरक्षणाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. संजय मादेशवार यांच्या बैलजोडीला 15 हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. दहा हजारांचा द्वितीय पुरस्कार अंकुश बगमारे, तृतीय क्रमांकाचा सात हजारांचा पुरस्कार दीपक सिंगेवार, पाच हजारांचा चतुर्थ पुरस्कार नामदेव अवथळे यांना तर तीन हजारांचा पुरस्कार पिंटू ठाकरे यांना मिळाला. रमेश यमनवार, अविनाश ठाकरे, राजेश ठाकरे, दिनेश तिवाडे, अजय रापर्तीवार यांना प्रत्येकी दोन हजारांचे प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले. सहभागी शेतकऱ्यांना श्रीफळ व धोतर देऊन सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT