police admitted naxal to hospital in gadchiroli 
विदर्भ

सहकाऱ्याच्या पायात गोळी लागली असतानाही नक्षलवादी पळाले, अखेर पोलिसांनी उचललं कौतुकास्पद पाऊल

मिलिंद उमरे

गडचिरोली : २९ मार्च रोजी खोब्रामेंढा-हेटाळकसा येथे झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत जखमी झालेला नक्षलवादी आणि टिपागड विभागीय उपकमांडर किशोर ऊर्फ गोंगलू ऊर्फ सोबू घिसू कवडो (वय ३८, रा. रामनटोला, ता. एटापल्ली) याला पकडण्यात कटेझरीच्या पोलिस पथकाला यश आले आहे. खोब्रामेंढा चकमकीदरम्यान त्याला गोळी लागल्याने तो जखमी अवस्थेत पडून होता. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊन त्याची प्रकृती आता व्यवस्थित असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेला पोलिस अधीक्षक गोयल यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख उपस्थित होते. माहिती देताना गोयल म्हणाले की, २९ मार्च रोजी खोब्रामेंढा-हेटाळकसा येथे झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत जहाल नक्षलवादी टिपागड विभागीय उपकमांडर किशोर कवडो याच्या पायाला गोळी लागली होती. नक्षलवादी त्याला जखमी अवस्थेत सोडून पळून गेले होते. चकमकीत जखमी कवडो पोलिसांपासून लपत गावांमध्ये नक्षल समर्थकांच्या मदतीने फिरत होता. त्याच्या पायाला गोळी लागली. पण, त्याला कुठेच वैद्यकीय उपचार घेता आले नाही. त्यामुळे त्याच्या पायाला गॅंगरीन होऊन पाय जवळपास सडला होता. गॅंगरीनमुळे गोळीचे विष शरीरातील इतर भागांतही पसरले होते. धानोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी व कटेझरी पोलिस मदत केंद्राच्या पथकाला किशोर कवडो हा गणपत कोल्हे या नक्षल समर्थकाच्या मदतीने लपून बसला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. यावेळी तो अत्यवस्थ अवस्थेत होता. त्याचा रक्‍तदाब अतिशय कमी झाला होता. पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी गणपत कोल्हे या नक्षल समर्थकालाही अटक केली आहे. 

पळपुटेपणाचे उदाहरण - 
एरवी नक्षलवादी चकमकीत जखमी झालेल्या सहकाऱ्याला कधीच एकटे सोडून जात नाहीत. अनेकदा चकमकीत ठार झालेल्या सहकाऱ्यांचे मृतदेहसुद्धा ते पोलिसांच्या हाती लागू देत नाहीत. पण, येथे किशोर कवडोच्या पायात गोळी लागलेली असतानाही तिथेच सोडून दिले आणि पळ काढला. 

कवडोवरील गुन्हे -

  • २२ चकमकी, ८ खून, ६ जाळपोळ व इतर ६ असे गुन्हे. 
  • १६ लाखांचे होते बक्षीस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT