arrested 
विदर्भ

नऊ लाखांची तूर चोरणारे अकरा आरोपी झाले गजाआड

संतोष ताकपिरे

अमरावती ः चांदूररेल्वे येथील बालाजी वेअरहाउस फोडून चोरीला गेलेल्या नऊ लाख रुपये किंमत असलेल्या १५९ क्विंटल तुरीच्या पोत्यासह गुन्ह्यात वापरलेली चार मालवाहू वाहने, अशी एकूण २५ लाखांच्या आसपास सामग्री जप्त करून पोलिसांनी अकरा जणांना अटक केली. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हेशाखेने याप्रकरणाचा छडा लावला. 

२ ते ३ सप्टेंबर २०२० रोजी चांदूररेल्वे येथील नाफेडचे गोदाम फोडून तेथून नऊ लाख रुपये किमतीची ३१८ पोती तूर चोरीस गेली होती. चांदूररेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अटक केलेल्या व्यक्तींपैकी चार वाहनचालक आहेत. त्यात दोघे चांदूररेल्वे येथील तर उर्वरित नऊजण बडनेऱ्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चांदूररेल्वे येथून चोरलेला तुरीचा माल बडनेरा येथील व्यापाऱ्यांना टप्प्याटप्याने विकण्यात आला. जप्त करण्यात आलेली चार वाहने गुन्ह्यात वापरल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. 

बडनेऱ्यात व्यापाऱ्याने चोरीचा माल घेतल्यानंतर विकलाही होता. परंतु जप्तीच्या वेळी त्याच व्यापाऱ्याला नंतर विकलेल्या मालाची जुळवाजुळव करावी लागली. लाखोंच्या तूरचोरीत सहभागी अकरा जणांमध्ये दोन अडत्यांचा समावेश आहे. उमेश बेदूरकर, संतोष डबाले, पंकज नाले, रोशन बानते, धीरजसिंग परिहार, प्रवीण शेलोकार, उमेश गलबले, पंकज वाघाडे, हेमंत खुरसडे, गौरव भुयार, रुपेश ठवकर या अकरा जणांना अटक करण्यात आली, असे पोलिस निरीक्षक सूरज बोंडे यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बोंडे, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पेंदोर, मुलचंद भांबूरकर, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, संदीप लेकुरवाळे, युवराज मानमोठे, अमित वानखडे, चेतन दुबे, विशाल भानुसे, सरिता चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शासकीय तूर प्लॅस्टिक पोत्यांत 

नाफेडच्या गोदामातून चोरलेल्या तुरीचे पोते बडनेरा येथील एका शेतात प्लॅस्टिकच्या पोत्यात रिकामे करण्यात आले. जुन्या पोत्यांचा गठ्ठा त्याच शेतात पडून होता, तोही पोलिसांनी जप्त केला. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT