police arrested one wanted criminal
police arrested one wanted criminal  
विदर्भ

दरोडेखोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; म्होरक्या फरार 

अनिल दंदी

अकोला : शहरात गुरुवारी (ता.30) दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील एका जणाच्या बाळापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 
मात्र या टोळीतील मुख्य सूत्रधार अभिमान शिवदास पवार (29) रा. वडजी ता. पैठण हा फरार झाला असून याने जळगाव, पैठण, नाशिक, बुलढाणा, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. अभिमान पवार व त्याच्या अन्य साथीदारावर राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात लुटमार व दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गुरूवारी शहरातील सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका अट्टल दरोडेखोराला बाळापूर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले होते. या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक चारचाकी वाहन, दरोड्याचे साहित्य व मिर्ची पुड असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र मुख्य सूत्रधार अभिमान पवार व त्याचे तीन साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. वडजी ता. पैठण येथील अभिमान पवार हा कुख्यात दरोडेखोर असून त्याची दरोडेखोरांची मोठी टोळी आहे. अभिमान पवार व त्याच्या साथीदाराव नगर येथील तोफखाना परीसरात दरोडे घातले आहेत. तर फुलंब्री, करमाड, पैठण, पाचोड, काचोड आदी पोलिस ठाण्यात तब्बल बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. 
काल ताब्यात घेण्यात आलेल्या अर्जुन फासाटे याला काल शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 4 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अर्जुन फासाटे याच्या कडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. पारस येथील दरोड्याचा या दरोडेखोरांचा काही संबध आहे का? या दिशेने पोलीसांचा तपास सुरू आहे.

दरोडेखोरांच्या टोळीतील मुख्य सूत्रधार अभिमान पवार व त्याच्या साथीदारांवर पैठण पोलिस ठाण्यात लुटमार व घरफोडीचे विविध गुन्हे दाखल आहेत. 
टोळीतील एकाला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या कडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.
 
- वैभव पाटील प्रभारी ठाणेदार बाळापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT