विदर्भ

27 घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या एलसीबीने आवळल्या

सूरज पाटील

यवतमाळ : दोन जबरी चोरी आणि तब्बल 27 घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. पिता-पुत्रासह पाच संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी (ता.7) दिली.

पुसद ते पोफळी रोडवरील घाटात पाच संशयितांनी दोन दुचाकीवर येऊन वाहन धारकांना बंदुकीच्या धाकावर लुटल्याची माहिती पथकाला मिळाली. एका व्यक्तीने पोलिसांच्या मदतीने अनिल काळे (वय 31, रा. उमरखेड) याला पकडले. त्याच्याकडून इतर संशयितांची नावे समोर आली.

एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके यांच्या पथकाने आकाश प्रकाश चव्हाण (वय 23), प्रकाश शेखर चव्हाण( वय 55), अविनाश प्रकाश चव्हाण (वय 26, तिघेही रा. इरिगेशन कॉलोनी, उमरखेड), विकास भगवान बन (वय 21, रा. झाडगाव) यांना अटक केली. पाचही चोरट्यांनी उमरखेड शहर, तालुक्यातील नागेशवाडी, विडुल, निंबगव्हान व यवतमाळ, महागाव, पुसद शहरात 27 घरफोड्या केल्या. तसेच शिरोना व गगनमाळ शिवारात जबरी चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बोंडे, संदीप चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक संतोष मनवर, पीएसआय नीलेश शेळके, साहेबराव राठोड, ओमप्रकाश यादव, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, विशाल भगत, हरिष राऊत, मोहम्मद ताज मोहम्मद जुनेद, सतीश गजभिये, सुरेंद्र वाकोडे यांनी केली.

रोख रक्कमेची हिस्से वाटणी

अविनाश चव्हाण व अनिल काळे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी इतर संशयिताच्या मदतीने चोरीचे गुन्हे केले. चोरीतील रोख रक्कमेची ते हिस्से वाटणी करायचे. मात्र चोरीतील सोन्याचे दागिने विकल्यास पकडल्या जाऊ ही भिती त्यांना कायम सतावत होती. त्यामुळे दागिने विविध ठिकाणी लपवून ठेवले होते. 

नोकरी असूनही चोरीत सहभाग

प्रकाश चव्हाण हा इरिगेशन विभागात चालक म्हणून नोकरीवर आहे. तरी मुलांसोबत चोरी व जबरी चोरीत सहभागी व्हायचा. त्याचा मुलगा अविनाश सराईत असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे.

19 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी 457 ग्रॅम सोन्याचे, 1060 ग्रॅम चांदीचे असे 16 लाख 74 हजार 680 रुपयांचे दागिने, अविनाश याने गुन्ह्यात वापरलेली देशी बनावटीची पिस्टल, दोन जिवंत काडतुस, दोन दुचाकी, रोख 50 हजार रुपये असा एकूण 19 लाख चार हजार 680 रुयायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT