Police custody Sakal
विदर्भ

गंगाची आत्महत्या लैंगिक शोषणातून; पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस कोठडी

आरोपी विजय ला आत्महत्येस प्रवृत करून आत्याचार केल्या प्रकरणी २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

उमरखेड (जि. यवतमाळ) : २४ डिसेंबर रोजी शहरातील वसंत नगर भागात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या जिल्हा दंगल पथकातील पोलीस कर्मचारी यांच्या कडे २० वर्षीय गंगा नामक तरुणीने आत्महत्या (Suicide) केली त्या प्रकरणी आरोपी पोलीस कमर्चारी विजय हटकर (४२) यांना २५ डिसेंबर ला रात्रीला उमरखेड ठाणेदार यांनी अटक (Arrest) केली असुन घटनेतील आरोपी विजय ला आत्महत्येस प्रवृत करून आत्याचार केल्या प्रकरणी २ जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी (Police Custody) मिळाली आहे. अशी माहिती उमरखेड चे ठाणेदार अमोल माळवे यांनी दिली.

अनेक वेळा नागरिक पोलीसांकडुन मदती करिता धावधाव करतात आणि त्याच पोलीस कर्मचारी यांनी महिलांवर अत्याचार केल्या जातात त्यामुळे या बाहेर आलेल्या प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मल्लीन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत गंगा कोरडे ( २० ) हि तरुणी पुसद तालुक्यातील वेणी येथील रहिवाशी आहे या मुलीला आरोपी पोलीस कर्मचारी विजय हटकर (४२) यांनी पोलीस नौकरी लावुन देतो म्हणुन उमरखेड येथील खासगी पोलीस प्रशिक्षण अॅकाडमी मध्ये प्रवेश मिळवुन देउन लग्नांचे अमिस दाखवुन स्वतच्या घरी ठेऊन अत्याचार केला हे मृतक गंगा चे वडिल संजय कोरडे रा. वेणी ता. पुसद यांच्या फिर्यादीतुन व शवविच्छेदन अहवालातुन निष्पन्न झाले आहे.

आरोपी विजय हा जिल्हा दंगल नियंत्रन पथकामध्ये कार्यरत होता आणि त्यांची कामगिरी नियुक्ती बंदोबस्त कामी उमरखेड येथे देण्यात आली होती. आणि तो ६ डिसेंबर पासुन रजेवर होता अशीही माहिती ठाणेदार माळवे यांनी पत्रकारांना दिली.

आरोपी विजय हटकर ( ४२ ) रा उमरखेड यांच्या विरुद्ध मृतक तरुणीचे वडिल यांच्या फिर्यादी वरुण उमरखेड पोलीसांनी भा द वि ३७६ , ३०६ ( २ ) ( एन ) , ३६६ नुसार गुन्हा नोंदवुन अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT