विदर्भ

Vidhan Sabha 2019 : "चुलीत गेलं तुमचं राजकारण' 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर, ता. 6 : विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग करू नये याबाबतच्या सूचना देणारे पत्र पोलिसांकडून राजकीय कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. राजकारणात असल्याने पोलिसांचे पत्र घरी आल्यावर "चुलीत गेलं तुमच राजकारण' असे बोल कार्यकर्त्यांना कुटुंबीयांकडून ऐकावे लागत आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलिसांकडूनही सूचना देण्यात आल्या आहेत. मोवाड येथील काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नरखेडचे ठाणेदार मल्लीकार्जून इंगळे यांनी सूचना पत्र पाठवून आचारसंहितेचा भंग करू नये, अन्यथा कारवाई करण्याचे खबरदारी पत्र पाठविल्याची माहिती आहे. इंगळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मोवाड चौकीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी यास दुजोरा दिला. मोवाड येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे दिलीप बानाईत व युवासेनेचे ललित खंडेलवाल या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कुटुंबीयांनी राजकारणावरून चांगलेच सुनावले. 
सोशल मीडियावर हे पत्र टाकल्यावर कोणताही आक्षेपार्ह मजकूर न टाकण्याचे आवाहन ग्रुप ऍडमिन करू लागले आहेत. नरखेड तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनाच असे पत्र मिळाल्याचे सध्यातरी समोर आले आहे. इतर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यावर अद्याप असे पत्र आले नसल्याची माहिती मिळाली. 

घरी पत्र पाठविण्यापेक्षा ठाणेदारांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन एकत्रितपणे अशा सूचना द्यायला हव्या होत्या. घरी पत्र पाठविल्यामुळे कुटुंबीय दबावात आले आहे. कार्यकर्ता म्हणून आम्ही केवळ पक्षाचा प्रचार करतो. 
- दिलीप बानाईत, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, मोवाड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT