police ran away from ACB officer custody in Chandrapur  
विदर्भ

ठाणेदाराला धक्का देऊन पोलिसानं काढला पळ; लाच घेताना एसीबीनं केली होती अटक 

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : ट्रकचालकमालकाकडून दहा हजार रूपयाची लाच मागण्याकरिता पोलीसाने एका होमगार्डला पाठविले. पण होमगार्ड एसीबीच्या जाळयात अडकला.काही क्ष़्ाणातच त्या पोलिसाला ताब्यात घेण्यात आले.पण एसीबीच्या ठाणेदाराला धक्का देत तो पोलीस पसार झाला. आज सात वाजता गोंडपिपरीच्या गांधी चैकात हि घटना घडली.आता एसीबीचे पथक त्या फरार पोलिसाचा शोध घेत आहेत.

गोंडपिपरी येथील एक तरूण ट्रकचालक मालक आहे.येथील पोलीस हवालदार देवेश कटरे याने तू दारूचा व्यवसाय करतो.तुझी ट्रक आमच्या मार्गाने चालते.तुझ्यावर कार्यवाही करणार. तुझा ट्रक ठाण्यात लावणार.जर हे करायचे नसेल तर मला दहा हजार रूपये दे अशी मागणी केली.सदर तरूणाला अशा स्वरूपात पैसे देण्याची मुळीच इच्छा नव्हती.त्यामुळे त्या तरूणाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानुसार आज रात्री सात वाजताच्या सुमारास गोंडपिपरींच्या गांधी चैकात सापळा रचण्यात आला.पोलीस हवालदार देवेश कटरे याने आपल्या होमगार्ड असलेल्या सहकार्याला तरूणाकडून रक्कम स्विकारण्यास सांगितले.यावेळी रक्कम घेताच घटनास्थळी उपस्थित राहिलेल्या लाचलुचपत विभागाचे ठाणेदार यशवंत राउत यांच्या पथकाने होमगार्डला रंगेहाथ पकडले.यावेळी हजर असलेल्या देवेश कटरे यालाही पकडण्यात आले.मात्र त्याने ठाणेदार राउत यांना धक्का देत घटनास्थळावरून पळ काढला.

राउत यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीस हवालदार देवेश कटरे हा फरार आहे. पोलीस पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.याच प्रकरणात पुन्हा एक पोलीस देखिल फरार असल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणात उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

आज गोंडपिपरीत आमच्या पथकाने कार्यवाही केली.या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार पोलीस देवेश कटरे याने मला धक्का देत पळ काढला.तो सध्या फरार असून त्याचा शोध आम्ही घेत आहोत.
यशवंत राउत,
पोलिस निरीक्षक एसीबी,गडचिरोली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT