file photo
file photo 
विदर्भ

एम्टाच्या कोळसा चोरीची पोलिसात तक्रार

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : कर्नाटक एम्प्टाच्या भद्रावती येथील बंद खाणीतील कोळसा चोरीची चौकशी करावी, असे पत्र आता खनिकर्म विभाग पोलिस प्रशासनाला देणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कोळसा चोरी प्रकरणात प्रशासनाकडून बरीच लपवाछपवी केली आहे. प्रशासनाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार तब्बल तीन लाख 57 हजार टन कोळशाचा गायब झाला आहे.
सहा महिन्यांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्र आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. गजानन कामडी यांनी बंद खाणीतील उपलब्ध कोळशाची पाहणी केली. त्यांच्या अहवालात 94 हजार टन कोळसा जळून खाक झाल्याचे नमूद आहे. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याच एका पत्रानुसार कर्नाटक एम्प्टा कोलमाइन्स लिमिटेडने सप्टेंबर 2008 ते फेब्रुवारी 2015 पर्यंत 1 कोटी 51 लाख 86 हजार 553 टन कोळशाचे उत्पादन केले. त्यापैकी 1 कोटी 47 लाख 35 हजार 269 मेट्रिक टन कोळसा डिस्पॅच करण्यात आला. 31 मार्च 2015 पासून हा खाणपट्टा बंद झाल्यानंतर 4 लाख 51 हजार 284 मेट्रिक टन कोळसा शिल्लक असल्याचे म्हटले आहे. यातील 94 हजार मेट्रिकटिन कोळसा जळाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आहे.
मात्र यापार्श्‍वभूमीवर उर्वरित तीन लाख 57 हजार टन कोळसा गेला कुठे, असा प्रश्‍न निर्माण होतो. सत्ताधारी पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांचे पाठबळ असलेल्या दोन कोळसा वाहतूकदार कंपन्यांनी पडोली येथील युनूस नामक कोळसा व्यापाऱ्याला पुढे करून या खाणीतील कोळसा चोरला. या कोळसा चोरीची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करणार, असे खनिकर्म अधिकारी डॉ. गजानन कामडे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे 2018 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सलिल यांनी एम्म्टाच्या व्यवस्थापनाला खाणीतील कोळसा चोरी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेबाबत कळविले होते. मात्र सलिल यांनीही सन 2015 पासून 2018 पर्यंत याप्रकरणाकडे दुर्लक्ष केले. आता साडेतीन लाख टन कोळसा कागदावर आहे. परंतु तो खाणीत नाही, हेच प्रशासनाने कबूल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT