file photo 
विदर्भ

वेळेवर धावून आला 'परमेश्‍वर' म्हणून वाचला बापलेकीचा जीव...

सकाळ वृत्तसेवा

शंकरपूर (चंद्रपूर) : तीन वर्षांची चिमुकली खेळण्यात दंग होती. खेळता खेळता ती सार्वजनिक विहिरीजवळ आली. विहिरीत डोकावताच ती आत पडली. ही बाब तिच्या वडिलाच्या लक्षात आली. काळजाच्या तुकड्यासाठी त्यांनी कशाचीही पर्वा न करता विहिरीत उडी घेतली. त्यांना पोहता येत नव्हते. बापलेक दोघेही गंटागळ्या खायला लागले. त्याच वेळी गस्तीवर असलेल्या एका पोलिस शिपायाच्या कानावर ही गोष्ट आली. त्याने कसलाही विचार न करता विहिरीत उडी मारली आणि बापलेकीला सुखरूप बाहेर काढले. ही थरारक घटना शंकरपूर येथील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये शुक्रवारी रात्री 8.30च्या सुमाराला घडली. परमेश्‍वर नागरगोजे असे त्या पोलिस शिपायाचे नाव. 

शंकरपूर पोलिस चौकीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक श्री. जांभळे आपल्या कर्मचाऱ्यांसह गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना वॉर्ड क्रमांक 5 मध्ये सार्वजनिक विहिरीवर गर्दी आणि आरडाओरड होताना दिसले. त्यांनी तातडीने धाव घेतली. चौकशी केली. तेव्हा प्रभाकर बारेकर यांची तीन वर्षांची मुलगी खेळताना विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या वडिलांनी विहिरीत उडी घेतल्याचे सांगण्यात आले. सगळे घाबरलेले होते. 

विहिरीत बापलेक दोघेही गटांगळ्या खात होते. यावेळी पोलिसांच्या पथकात शिपाई परमेश्‍वर नागरगोजेही होते. त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. आपला भ्रमणध्वनी आणि पैशाचे पाकीट सहकाऱ्यांजवळ दिले आणि थेट विहिरीत उडी मारली. विहीर 40 फूट खोल. त्यात 15 फुटांपर्यंत पाणी आहे. मात्र, परमेश्‍वर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. 

बापलेकीला शंकरपूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली आहे. थोडाही उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, परमेश्‍वर यांच्या धाडसाने दोघांचा जीव वाचला. हा थरार गावकऱ्यांनी अनुभवला. सगळ्यांनी पोलिस शिपाई परमेश्‍वर नागरगोजे यांचे आभार मानले. नावच नाही, तर तुम्ही आमच्यासाठी साक्षात परमेश्‍वर आहात, अशी भावना चिमुकलीच्या वडिलाची होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT