Police
Police 
विदर्भ

चोरट्याने पोलिसाला बनवले ‘मामा’

सकाळवृत्तसेवा

नागपूर - सामान्यांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस नेहमी करीत असतात. मात्र, यावेळी चोरट्याने पोलिस दादालाच ‘मामा’ बनवले. पोलिस कर्मचाऱ्याची २० हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान हद्दीतील कामगार नगर, पोलिस लाइन टाकळी, नागपूर येथे राहणारे दीपक शालीकराम झाडे (४५) हे पोलिस विभागात कार्यरत आहेत. २० मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घरी असताना त्यांना अनोळखी आरोपी बजाज फायनान्स कंपनीच्या क्रेडिट कार्डचा ओटीपी नंबर विचारून त्यांच्या नावावर अज्ञात आरोपीने फ्लिपकार्ट कंपनीच्या माध्यमातून ३९ हजार ०६९ रुपयांचा ॲपल कंपनीचा मोबाईल विकत घेतला. या मोबाईलची किस्त भरण्याच्या संबंधाने झाडे यांच्या नागपूर नागरिक सहकारी बॅंकेच्या खात्यातून २० हजार रुपये कापून घेतले. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी बजाज फायनान्स कंपनीमध्ये जावून विचारपूस केली असता त्यांच्या नावाने अज्ञात आरोपीने मोबाईल फोन विकत घेवून फसवणूक केल्याचे लक्षात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT