Police uncle, police Didi came to protect the student 
विदर्भ

शाळेतील अत्याचाराचे प्रकार दबणार नाही तर येणार उघडकीस, वाचा कसे...

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : शाळांमध्ये विद्यार्थिनींवर होत असलेले अत्याचाराचे काही प्रकार पुढे येतात तर काही दबल्या जातात. हे सर्वच प्रकार पुढे यावे यासाठी पोलिस महासंचालकांच्या विचारातून "पोलिस दीदी, पोलिस काका' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. "कम्युनिटी पोलिसिंग'अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. 
वर्ध्यात शनिवारी (ता. 25) या उपक्रमाचे पोलिस अधीक्षकांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. 

या उपक्रमाअंतर्गत ज्या पोलिस कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्‍ती करण्यात आली ते कर्मचारी आठवड्यातून ठरलेल्या दिवशी त्या शाळेला भेट देणार आहेत. भेटीदरम्यान पोलिस दीदी, पोलिस काका शाळेतील विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. शिवाय शाळेत असलेल्या क्रमांकावरही संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळेतून एखाद्या विद्यार्थ्याची तक्रार आल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाअंतर्गत एका पोलिस कर्मचाऱ्याकडे तीन शाळा देण्यात आल्या आहेत. 

उद्‌घाटन कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांचे शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली असून, त्यांच्याकडून यावर अंमलबजावणी करण्याचे आवाहनही पोलिस विभागाकडून करण्यात आले आहेत. या उपक्रमावर येत्या एक फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यात येणार असली तरी अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आताही तक्रार केल्यास मदत मिळणार असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे. उद्‌घाटन कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसह चारही विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

शाळांना पाठविले पत्र

उपक्रमाची माहिती देण्यासाठी पोलिस विभागाकडून जिल्ह्य्रातील सर्वच शाळांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार त्या ठाण्याअंतर्गत कर्मचाऱ्याची नियुक्‍ती शाळेत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT