crime e sakal
विदर्भ

गडचिरोली : पोलिस वाहन चालकाचा मध्यरात्री खून, तपास सुरू

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : पोलिस वाहनचालकाचा (police vehicle driver murder) अज्ञात व्यक्तीने धारदार चाकूने गळा कापून खून केला आहे. ही घटना अहेरी तालुक्यातील नागेपल्ली (nagepalli of gadchiroli) येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये रविवारी (ता. ४) रात्री घडली. या खुनामुळे परिसरात व पोलिस विभागात (gadchiroli police) मोठी खळबळ उडाली आहे. जगन्नाथ सिडाम (वय ५३) असे खून झालेल्या पोलिस वाहनचालकाचे नाव आहे. (police vehicle driver murder by unknown person in gadchiroli)

जगन्नाथ सिडाम हे भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्रात कार्यरत होते. रविवारी रात्री ते नागेपल्ली येथील आपल्या राहत्या घरी झोपून असताना अज्ञात मारेकरूने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना उठविले व काही कळण्याच्या आतच धारदार चाकूने त्यांचा गळा कापला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ठाकुर, पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे हे श्वान पथकासह दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT