ST News esakal
विदर्भ

Yavatmal News : पोलिस वॉरंटची रक्कम वाहनांकडून वसूल; वाहकांमध्ये नाराजीचा सूर, एसटी महामंडळात गोंधळ

पोलिस वॉरंटची रक्कम ईबीक्स कार्यप्रणाली असलेल्या मशीनमधून तिकीट देण्यात येते. परंतु आगारामध्ये हिशोब दिल्यानंतर वॉरंट शॉर्टेज दाखविल्या जाते.

चेतन देशमुख

यवतमाळ : पोलिस वॉरंटची रक्कम ईबीक्स कार्यप्रणाली असलेल्या मशीनमधून तिकीट देण्यात येते. परंतु आगारामध्ये हिशोब दिल्यानंतर वॉरंट शॉर्टेज दाखविल्या जाते. याचा भुर्दंड वाहकांना बसत असून तिकिटाची रक्कम वसूल केली जात आहे.या प्रकारामुळे वाहकांमध्ये नाराजीचा सूर असून एसटी महामंडळात गोधळांची स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांत एसटी अत्याधुनिक बदल झाले आहे. पारंपरिक तिकिटांची टिकटिक बंद होऊन त्या जागी मशिन आल्या आहेत. सुरवातीला ‘ट्रायमॅक्स’ या कंपनीला तिकीट मशिनचा कंत्राट देण्यात आला होता. अनेक वर्ष या कंपनीकडेच काम होते. कालातरांने मशिनमध्ये तांत्रिक अडचणी वाढल्या. वापर करताना वाहकांनाही अडचण येऊ लागली होती.

परिणामी ‘ट्रायमॅक्स’ऐवजी आता ‘ईबीक्स’ कंपनीला मशिनचा कंत्राट देण्यात आला आहे. पूर्वीच्या मशिनच्या तुलनेत ही मशिन वाहकांना वापरण्यासाठी अत्यंत सोईची असली तरी ‘सॉफ्टवेअर’ च्या मुळे वाहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना कामानिमित्त बसमधून प्रवास करण्यासाठी वॉरंट देण्यात आले आहेत.

वॉरंट दिल्यानंतर वाहक त्यांना मशिन मधून संबंधित रकमेची तिकीट देतात. मशिनमध्ये पैसे जमा झाल्याची एन्ट्री होत नाही. परंतु हिशोब देतेवेळी चार ते पाचपट तिकीट दिसत असून ते वाहकांनाही माहीत होत नसल्याचा आक्षेप सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा आहे. यामुळे ही रक्कम वाहनांकडून वसूल केली जात आहे. वाहकांची चूक नसतानाही रक्कम वसूल केली जात असल्याने ती थांबविण्याची मागणी सेवा शक्ती संघर्ष संघाने एसटी महामंडळांच्या व्यवस्थापकीय संचालकांना केली आहे.

वॉरंट तिकिटाची अडचण ईबिक्स तिकीट प्रणालीच्या तांत्रिक बिघाडामुळे होत आहे. यामुळे वाहनांकडून पैसे वसूल करणे चुकीचे आहे. तांत्रिक बिघाडाचा तपास करून दुरुस्ती करेपर्यंत पोलिस वॉरंट शॉर्टेजची वसुली करण्यात येऊ नये.

- सचिन गिरी, विभागीय सचिव सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT