patroling
patroling 
विदर्भ

रात्री पोलिस गस्त घालीत होते, त्याच वेळी आला एक ट्रक अन्‌.... 

सकाळ वृत्तसेवा

वरुड (जि. अमरावती)  : रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना अवैधरीत्या 208 कट्टे तांदूळ वाहून नेणारा एक ट्रक वरुड पोलिसांनी ताब्यात घेतला. परंतु ट्रकमधील तांदूळ कुणाचा, तो कुठे जात होता, याबाबत अद्याप स्पष्टता झाली नसून पोलिस तपास सुरू आहे. 

मंगळवारी, 30 जूनची रात्र. ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संघरक्षक भगत, रवींद्र धानोरकर, निरंजन उकंडे व चालक अजय ठाकरे गस्तीवर होते. गस्त सुरू असताना एक ट्रक मोर्शीवरून नागपूरकडे भरधाव जात होता. पोलिसांनी ट्रकला थांबवून अधिक चौकशी केली असता ट्रकमध्ये तांदूळ असल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तांदळाची बिल्टी व इतर कागदपत्रांची मागणी केली. मात्र, चालकाकडे तांदळासंदर्भात कुठलेही कागदपत्र आढळून आले नाही. पोलिसांना संशय आल्याने अखेर ट्रक पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आला. परंतु ट्रकमधील तांदूळ कोणाचा आणि कुठे चालला होता, याबाबत कुठलीही माहिती मिळू शकली नाही. 

अखेर पोलिसांनी तहसीलदार सावंत यांच्याशी संपर्क साधून हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील आहे काय, याबाबत अहवाल मागितला. तहसीलदारांनी निश्‍चित सांगता येणार नाही, असा अहवाल दिला. त्यामुळे आता हा तांदूळ कोणाचा आणि कुठून कुठे चालला होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी हा ट्रक जप्त केला असून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असून यात मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT