Political Launching of Rana Digvijay Singh Sananda? 
विदर्भ

राणा दिग्‍वीजयसिंह सानंदा यांचे राजकीय लॉचिंग?

श्रीधर ढगे

खामगाव (जि.बुलडाणा) :  मुंबई येथील शिवाजी पार्कवर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा शपथविधी पार पडला. यावेळी खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी सुध्दा या सोहळ्याला हजेरी लावली. त्‍यांचे चिंरजीव दिग्‍वीजयसिंह सानंदा हे देखील त्‍याठिकाणी उपस्‍थित होते. त्‍यांनी दिलीपकुमार सानंदा यांच्‍यासह कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणारे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे पुष्पगुच्‍छ देवून अभिनंदन सुध्दा केले. एखाद्या राजकीय कार्यक्रमाला उपस्‍थित राहण्याची दिग्‍वीजयसिंह सानंदा यांची ही पहिलीच वेळ होती. त्‍यामुळे येणाऱ्या काळात खामगावच्‍या राजकारणात त्‍यांचे लॉचिंग होणार का ? असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे. 

सानंदा घराणे हे गेल्‍या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तीन वर्षापूर्वी झालेल्‍या नगर परिषद निवडणुकीत सानंदा घराण्याच्‍या नव्‍या पिढीतील अमेय सानंदा यांनी नगर परिषदेच्‍या निवडणुकीमधून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली.  तर आता दिग्‍वीजय सानंदा यांनी पहिल्‍यादांच राजकीय कार्यक्रमाला लावलेली हजेची चर्चेचा विषय बनला आहे. दिग्‍वीजयसिंह सानंदा हे सध्या पुणे येथे शिक्षण घेत असून सध्या ते १९ वर्षाचे आहेत. तर आताच्‍या परिस्‍थितीवरुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्‍यांचे राजकीय लॉचिंग झाल्‍यास आश्‍चर्य वाटायला नको. 

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी सलग तिन वेळा खामगाव मतदार संघाचे प्रतिनिधीत्‍व केले असून त्‍याकाळात त्‍यांनी   पंचायत समिती, जिल्‍हा परिषद, नगर परिषद या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांवर एकहाती सत्‍ता स्‍थापित केली होती. त्‍यामुळे अजुनही काँग्रेसचा कार्यकर्ता त्‍यांच्‍याशी जुळून आहे. व आता राज्‍यात बदललेल्‍या समिकरणांमुळे  महाविकास आघाडीची सत्‍ता आली असून काँग्रेस देखील या सत्‍तेत सहभागी असल्‍याने संपुर्ण राज्‍यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्‍साह पाहावयास मिळत आहे. 

नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणूकीत सानंदा यांनी राजकीय परिस्‍थितीचा अंदाज घेत माघार घेतली. परंतु सानंदांच्‍या नियोजनाखालीच ही निवडणूक लढल्‍या गेल्‍याने काँग्रेस कार्यकर्त्यांची त्‍यांनी या निवडणुकीत मोट बांधली होती. तर आता काँग्रेस सत्‍तेत आल्‍याने कार्यकर्ते देखील आनंदीत आहेत. बदललेल्‍या समिकरणांचा खामगाव मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे. येणाऱ्या पाच वर्षात बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्‍यता असून त्‍यातीलच एक म्‍हणजे दिग्‍वीजयसिंह  सानंदा यांचे राजकीय लॉचिंग ठरु शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT