file photo
file photo 
विदर्भ

प्रदूषणाचे संकट "पाक'पेक्षा मोठे : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

उमरेड : प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरणपूरक विकासासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे केले. सरकारच्या 35 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी आयोजित जनजागृती वृक्षदिंडीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटींवार, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन व पर्यावरण राज्यमंत्री परिणय फुके, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे, अनिल सोले, उमरेडच्या नगराध्यक्ष विजयालक्ष्मी भदोरिया यांच्या उपस्थितीत उमरेड येथील दुर्गा स्टेज येथे झाला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही दरवर्षी एकाच खड्ड्यात झाडे लावत असल्याचा आरोप केला जातो. मात्र, लावलेल्या झाडांना टॅगिंगची सोय असल्याने असल्याने गैरप्रकार होणार नाहीत याची खात्री आहे. विदर्भाच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याची आज गरज आहे, असेही ते म्हणाले.सुधीर मुनगंटीवार यांनी, वृक्षलागवडीचा संदेश राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक अनिल सोले यांनी, संचालन डॉ. मुकेश मुद्‌गल यांनी केले. कार्यक्रमाला आमदार नागो गाणार, गिरीश व्यास, मल्लिकार्जुन रेड्डी, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.  सत्र न्यायालयासाठी 25 कोटी उमरेड शहरात सत्र न्यायालयाच्या इमारतीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जाईल. जिल्हा मुख्यालया व्यतिरिक्त पाहिले जिल्हा सत्र न्यायालय उमरेडमध्ये सुरू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
900 झाडांची लागवड
33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जून महिन्यात ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन या संस्थेने वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. तसेच उमरेड शहरात वनविभागाच्या तीन एकर जमिनीवर 900 पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली. उमरेडमध्ये वृक्षलागवड कार्यक्रमात फळझाडे लावण्याची मागणी आमदार पारवे यांनी केली असून ती पूर्ण केली जाईल, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT