file photo 
विदर्भ

आता या व्यवसायाला येणार सुगीचे दिवस...दुष्टचक्र आटोक्‍यात

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या भीतीने शौकिनांनी चिकनकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. परिणामी दर निच्चांकी झाला होता. आता मात्र ही परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे. मागणी वाढल्याने चिकनचा दर पूर्वपदावर आला आहे.

अचानक मागणी वाढल्याने व उत्पादन कमी असल्याने हे दर अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले पोल्ट्री उद्योगाचे दुष्टचक्र आटोक्‍यात येण्याची चिन्हे आहेत.

चिकनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होतो, या गैरसमजाचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला होता. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांची संख्या रोडावली होती. परिणामी विक्रेत्यांनी दर कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सोशल मीडियाच्या गैरसमजाच्या लाटेत पोल्ट्री उद्योग अक्षरशः उद्‌ध्वस्त झाला. पोल्ट्रीधारकांवर एक कोंबडी दहा ते वीस रुपयांना विकण्याची वेळ आली. काही पोल्ट्रीधारकांनी तर आठवडी बाजारात फुकटच कोंबड्यांची विक्री केली तर काहींनी जंगलात सोडून दिल्या. त्यामुळे पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांचे उत्पादन होणे जवळपास बंद झाल्यात जमा होते.

डॉक्‍टरांनीही सांगितले फायदे

मात्र, गेल्या आठवडाभरापासून चिकनच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डॉक्‍टरांनी तसेच राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी चिकन आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले. त्यामुळे खाणाऱ्यांनी पुन्हा मोर्चा चिकनकडे वळवला आहे. आता मात्र उत्पादन कमी झाल्याने कोंबड्यांचे भाव कडाडले आहेत. मागणी जास्त आणि उत्पादन कमी, त्यामुळेच चिकनचे दर वाढण्याची शक्‍यता आहे.

चिकनची मागणी अधिक वाढणार

त्यातच लॉकडाउन असल्याने बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी मटणाची तुरळक विक्री सुरू आहे. साहजिकच याचा परिणाम मागणीत वाढ करणारा ठरला. गेल्या आठवड्यात 120 रुपये किलो या दराने विक्री सुरू होती. हळूहळू हा दर वाढत आता पूर्वीप्रमाणेच 180 रुपयांवर स्थिरावला आहे. यामध्ये पुन्हा दर वाढण्याची शक्‍यता चिकन विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

लॉकडाउन संपल्यावर चिकनची मागणी अधिक वाढणार, हे निश्‍चित. सध्या चिकनपासून विविध पदार्थ तयार करणारे सर्वच हॉटेल बंद असल्याने काही अंशतः चिकनचे दर पूर्वीसारखेच आहेत. मात्र, हॉटेल सुरू झाल्यानंतर चिकनची कमतरता भासणार, हे निश्‍चित असल्याचे पोल्ट्रीधारक तथा चिकनविक्रेते बोलून दाखवित आहेत.

चिकनचे ग्राहक वाढले
गेल्या पंधरवड्यापासून चिकनचे ग्राहक वाढले आहेत. मागणी वाढल्यामुळेच दरही वधारले आहेत. सर्व कुटुंबच घरी असल्याने मटणाच्या तुलनेत कमी दर असणाऱ्या चिकनला अधिक पसंती आहे. उपलब्ध असणाऱ्या कोंबड्यांची संख्या कमी असल्याने दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. लॉकडाउन संपल्यावर याचा परिणाम दिसून येईल.
- मतीन शेख, चिकनविक्रेते, परतवाडा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT