विदर्भ

‘रोटी बॅंके’मुळे गंगूबाई घरी

नितीन कुरई

बुटीबोरी - गरजू व निराधारांसाठी ‘रोटी बॅंक’च्या माध्यमातून भूक शमविणाऱ्या दोन युवकांच्या प्रयत्नाने मुकी गंगूबाई तिच्या कुटुंबीयांना तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा भेटू शकली. रोटी बॅंक चालविणारे हितेश बंसोड व तुषार डेरकर हे गंगूबाईसारख्या अनेक निराधारांसाठी देवदूत ठरले आहेत. 

चार वर्षांपूर्वी नातेवाइकाच्या गावाला जाण्यासाठी निघालेली सातगाव येथील गंगूबाई बापूराव मोहितकर वाट चुकल्याने बेपत्ता झाली होती. तिला बोलता येत नसल्याने ती पत्ताही सांगू शकत नव्हती. दहा-बारा दिवस भटकल्यावर कळमना पोलिसांनी तिला सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमात दाखल केले. तेव्हापासून ती वृध्दाश्रमातच होती, एकाकीपणाचा त्रास सहन करताना अनेकदा तिचे अश्रू अनावर झाले. वृद्धाश्रमालाच घर समजण्याची वेळ आली असतानाच रोटी बॅंक चालविणारे हितेश बनसोड सावनेरच्या स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमात पोहचले. गंगूबाईची कैफियत इतरांनी सांगताच तिच्या कुटुंबापर्यंत पोहचविण्याचा निर्धार करून हितेशने सोशल मीडियावरून प्रचार सुरू केला. यातच गंगूबाईच्या भावाने सोशल मीडियावर फिरणारा संदेश पाहिला. अन्‌ गंगूबाई परत आपल्या कुटुंबीयांकडे परतली. गुरुवारी (ता. २५) रोजी स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमात भावाला पाहिल्यावर गंगूबाईचे अश्रू अनावर झाले. 

रोटी बॅंकेचा  अविरत उपक्रम 
हितेश बन्सोड, तुषार डेरकर मागील अनेक वर्षांपासून सातत्याने रोटी बॅंकेच्या माध्यमातून निराधारांना अन्नदान करीत आहेत. त्यांच्या या कामात, पद्मिनी गोथवड, अर्चना निकोसे, हिमान्शू बतोले, मनीष राऊत, मिलिंद विश्वकर्मा, नीरज देशमुख, शुभम हिवरळे व उमेश मोरे आदी मदत करतात.

निराधारांना थोडासा आनंद देता यावा यासाठी आम्ही रोटी बॅंक सुरू केली होती. यामाध्यमातून दुरावलेल्या व्यक्ती भेट घडून आली हे आम्ही करीत असलेल्या कामाचे फलित आहे. यापुढेही असा उपक्रम सुरू राहील. 
- हितेश बन्सोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM: "मतमोजणी वेळी RO अधिकारी वॉशरूममध्ये जाऊन..." अनिल परब यांचे मोबाईल बदल प्रकरणी मोठे आरोप

Amboli Ghat : आंबोलीतला 'हा' धबधबा झाला प्रवाहित; घाटात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, हिरण्यकेशीला मोठ्या प्रमाणात पाणी

Snake In Car : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'

Lost Mobile : मोबाईल हरविल्यास चिंता सोडा.! केंद्राची यंत्रणा ठरतेय फायदेशीर; महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

Jayant Patil: या 8 गावांवर विशाल-विश्वजित यांचे विशेष लक्ष, जयंत पाटलांच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चे नियोजन?

SCROLL FOR NEXT