telhara mahavitarn. 
विदर्भ

बापरे! वीज कर्मचाऱ्यांनी केला चक्क चारच दिवसांचा आठवडा

पंकज भारसाकळे

तेल्हारा (जि. अकोला) : महाराष्ट्र्र शासनाने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट म्हणून पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय केला असून, त्याची अंमलबजावणी (ता.29 फेब्रुवारी) ठरविण्यात आली असल्याने त्याचा लाभ सर्वच शासकीय कार्यालयीन कर्मचाऱ्यांना होणार आहे. परंतु, तेल्हारा महावितरण कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहून हा आठवडा चक्क चारच दिवसांचा करून घेतला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवसभर दांडी
तेल्हारा तालुक्यातील महत्त्वाचे समजल्या जाणारे उप-कार्यकारी अभियंता कार्यालयातिल कर्मचाऱ्यांनी चक्क विक्रम केला असून, शुक्रवारी दिवसभरापासून उप-अभियंता रजेवर असल्यामुळे इतर अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामीण शहर अभियंता हे सुद्धा गैरहजर असल्याचे आढळून आले. शासनाच्या पाच दिवसाचा आठवडा या निर्णयानुसार, सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सलग दोन सुट्या असणार आहे. जास्तीच्या मोहामुळे कर्मचाऱ्यांनी चक्क दिवसभर दांडी ठेवली. यात एकही अधिकारी शुक्रवारी कार्यालयात फिरकला देखील नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिवसभर नाहक त्रास सहन करावा लागला. अश्या बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करतील काय? हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. अनेक नागरिक देयक भरण्यासाठी आले होते. मात्र, कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांना देयक भरता आले नाही. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत वरिष्ठांनी त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे.


'सकाळ' च्या माध्यमातून कैफीयत
कार्यालयात अनेक नागरिक देयक भरण्यासाठी आले होते. यावेळी काही शेतकरी सर्वसामान्य नागरिकांनी ही बाब 'सकाळ' च्या लक्षात आणून दिली. बिल भरण्यासाठी विलंब केला तर अधिकारी आम्हाला जोरजबरी करतो तसेच आम्ही जर काही वीज समस्या घेऊन आलो तर ते वेळेत सोडविल्या जात नाही. आम्ही काही बोललो तर आम्हाला दम दिल्या जातो शासकीय कामात अडथडा निर्माण केल्यास आपल्यावर गुन्हा दाखल होतात अशी कैफीयत उपस्थित नागरिकांनी मांडली.

वरिष्ठांनी कारवाई करावी
अधिकारी सुट्या न टाकता गैरहजर राहतात व सुट्टीवरून आल्यानंतर हजेरी रजिस्टरवर सह्या मारतात त्यामुळे जनतेच्या कामास मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. ही बाब गंभीर असून यावर वरिष्ठांनी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
-रितेश वाकोडे, झोन कार्याध्यक्ष, लाईन स्टॉप संघटना

अभियंता देतात उडवा-उडवीचे उत्तरे 
कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर राहणे ही बाब गंभीर आहे. शहराच्या वीज समस्यांबाबत कित्येक वेळा उप-कार्यकरी अभियंता यांना विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे देतात. कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत असतील तर अश्यान वर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रार करणार आहे.
-जयश्री पुंडकर, नगराध्यक्ष, तेल्हारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT