Praful Patel  Sakal
विदर्भ

Praful Patel : विधानसभेत राष्ट्रवादीचा ८५ ते ९० जागांवर दावा; प्रफुल पटेल म्हणाले...

आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांना जागावाटपासंदर्भात विचारले असता जुन्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमच्याकडे एकूण ५७ आमदार होते.

सकाळ वृत्तसेवा

Gondiya News : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. राष्ट्रवादीला रायगड ही एकमेव जागा जिंकता आली. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची घोर निराशा झाली. तरीही पराभवाने खचायचं नसतं.

आता विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या आहेत. राष्ट्रवादीकडून ८५ ते ९० जागांवर दावा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांनी दिली.

ते रविवारी गोंदियातील एन.एम.डी. महाविद्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांना जागावाटपासंदर्भात विचारले असता जुन्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमच्याकडे एकूण ५७ आमदार होते.

ही गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेत ८५ ते ९० जागा मागणार आहोत, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. त्यामुळे, महायुतीत राष्ट्रवादीकडून थेट ८५ ते ९० जागांवर दावा करण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला द्याव्यात, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे, महायुतीत आता जागावाटपावरुन पुन्हा राजी-नाराजी होते की काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

मंत्रिपद मलाच मिळणार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, एनसीपीला राज्यमंत्रीपद देऊ केल्यामुळे त्यांनी ते नाकारत कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपने आम्ही विचार करू असं म्हटलं आहे.

त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. त्यामुळे, सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपद देण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्री आलं तर ते मलाच मिळणार असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

राज्यात ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार....

लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि जी पदे खाली आहेत आणि आता लोकसभेत गेलेल्या सदस्य मुळे खाली पदे आहेत त्या ठिकाणी विस्तार करण्यात येईल.

विधानसभेला चित्र बदलेल

देशामध्ये नुकताच पार पडलेले लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए सरकारला अपेक्षित यश आलं नाही. महाराष्ट्रात देखील परिस्थिती वेगळीच राहिली. मात्र, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काहीतरी वेगळी राहील, विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र पूर्णपणे बदलेल असेही पटेल यांनी या प्रसंगी म्हटलं.

चुकीच्या प्रचाराचा फटका एनडीएला बसला

लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभेवर महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला. खा. प्रफुल पटेल लोकसभा निवडणुकीनंतर रविवारी पहिल्यांदाच गोंदियात आले असता त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रात एनडीए मागे राहण्याचे कारण म्हणजे विरोधकांनी संविधान बदलणार असा चुकीचा प्रचार केला. त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही मागे राहिलो, अशी खंतही प्रफुल पटेल यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील मानाच्या तिन्ही गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Ladki Bahin Scheme : 'या' कारणामुळे ‘लाडकी बहीण’ ठरणार अपात्र, नवा नियम काय सांगतो

Pune Rain : पुणे परिसरात आज पावसाचा अंदाज; बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

Red - White Onion: लाल आणि पांढरा कांदा खाताय? हे नक्की वाचाचं

SCROLL FOR NEXT