pragya  
विदर्भ

अखेर तिने घातलीच आकाशाला गवसणी! ‘टार्गेटेड’अभ्यासावर भर दिल्याने यूपीएससी ‘क्रॅक’

सूरज पाटील

यवतमाळ : अलिकडे स्पर्धा परीक्षांमधील मराठी टक्का वाढला आहे. आनंदाची बाब म्हणजे मुलीही यामध्ये मागे नाहीत. यवतमाळच्या लेकीने यूपीएससीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिऽवत विदर्भाची मान उंचावली आहे.

यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीलाच जावे लागते. हा गैरसमज आहे. संगणक युगात घरी बसून तुम्ही चांगल्याप्रकारे अभ्यास करू शकता. ‘टार्गेटेड‘ अभ्यासावर भर दिल्याने यूपीएससी ‘क्रॅक’करता आली, असे मत प्रज्ञा कैलास खंदारे यांनी व्यक्त केले.

यूपीएसी परीक्षेत देशातून ७१९ वी रँक मिळविलेल्या प्रज्ञा खंदारे यांनी शनिवारी (ता.आठ) दैनिक ‘सकाळ’शी संवाद साधला. प्रज्ञा यांचे वडिल शिक्षक असून, नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. तर, आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. भाऊ पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण दिग्रस येथेच पूर्ण केले. शेगाव येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविली. त्यानंतर पुणे येथील एका कंपनीत एक वर्ष नोकरी केली. मात्र, याच काळात स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली आणि आपणही प्रशासकीय सेवेत गेलेच पाहिजे, असा चंग बांधून २०१४ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन एमपीएससी, यूपीएससीची तयारी सुरू केली. एमपीएससीद्वारे असिस्टंट कमिश्‍नर म्युनिसपल कॉर्पोरशनसाठी निवड झाली.

यूपीएससीची तयारी करीत असतानाच इंडियन रेल्वे अकाउंट सर्विसेसच्या माध्यमातून नांदेड येथे कार्यरत आहे. आयएएस किंवा आयआरएस याच सेवेत जायचे असे ठरवून अभ्यास सुरूच ठेवला. चौथ्या प्रयत्नात ७१९ वी रँक मिळविली. यूपीएससीचा अभ्यास करताना टार्गेटेड अभ्यासावर भर दिला. छोटे-छोटे टार्गेट ठरवून अभ्यास केला. आपण नेमका कोणता अभ्यास किती वेळ करायचा, त्यासाठी दिवसभरात तीन सत्राचा टाईमटेबल ठरविला. रिव्हिजनवर विशेष भर दिला. दहा पुस्तके एका वेळी वाचण्याऐवजी एकच पुस्तक दहा वेळा वाचले पाहिजे. हे करीत असताना नवीन माहितीची नोंद घेतली पाहिजे. ध्येय ठरवून पाठलाग केल्यास यश मिळते, असेही प्रज्ञा खंदारे यांनी सांगितले.

यू-ट्यूबवरही स्पर्धा परीक्षेबाबत चांगले मार्गदर्शन
ग्रामीण भागातील विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत आपला ठसा उमटवित आहे. ही आनंदाचीच बाब आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा न्यूनगंड मुळीच बाळगू नये. यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला जावे लागते. हे पूर्ण सत्य नाही. कोचिंग क्लासेस लावण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, अशी समस्यादेखील विद्यार्थी पुढे करतात. यशदा, बार्टीसारख्या संस्था मदत करीत आहेत. यू-ट्यूबवरही स्पर्धा परीक्षेबाबत चांगले मार्गदर्शन केले जाते.
प्रज्ञा खंदारे
यूपीएससी ७१९ वी रँक, दिग्रस  

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT